शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 10:18 AM

डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ...

नवी दिल्ली : निवडणुकीच्या निकालानंतर जिंकलेला नेता विरोधकांचे  सिक्युरिटी डिपॉझिट कसे जप्त झाले, याची चवीने चर्चा करत असतो. यात त्याला वेगळाच आनंद मिळतो. अशावेळी डिपॉझिट वाचवूनही पराभूत होणे हे उमेदवाराला मोठे यश वाटत असते. डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ...

काय असते सिक्युरिटी डिपॉझिट? संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे विशिष्ट सुरक्षा रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम लोकसभा निवडणुकीसाठी २५ हजार रुपये आणि विधानसभा निवडणुकीसाठी १० हजार रुपये आहे. उमेदवार एकूण मतांपैकी कमीत कमी सहावा भागाची मते जर मिळवू शकला नाही, तर जमा केलेली रक्कम जप्त करून ती सरकारी तिजोरीत जाते.

विजयी उमेदवाराचेच डिपॉझिट जप्त होते तेव्हा...१९५२ मध्ये आझमगडच्या सगडी पूर्व विधानसभा जागेवर ८३,४३८ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी केवळ ३२,३७८ जणांनी मतदान केले.निवडणुकीत काँग्रेसचे बलदेव (४९६९ मते) यांनी अपक्ष शंभूनारायण (४३४८ मते) यांच्यावर विजय मिळवला. परंतु, त्यांना एकूण मतांच्या एक षष्ठांश मते न मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते.

राष्ट्रीय पक्षांचा खर्च  किती ? डिपॉझिट वाचविण्याच्या बाबतीत राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची कामगिरी चांगली राहिली आहे. १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या १२१७ उमेदवारांपैकी ३४४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. १९७७ मध्ये राष्ट्रीय पक्षांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी दिसून आली. त्यावेळी पक्षांच्या १०६० उमेदवारांपैकी केवळ १०० उमेदवारांचे  सिक्युरिटी डिपॉझिट जप्त करण्यात आले होते. २००९ मध्ये राष्ट्रीय पक्षांच्या १६२३ उमेदवारांपैकी ७७९ उमेदवारांचे सिक्युरिटी डिपॉझिट जप्त झाले होते.

सिक्युरिटी डिपॉझिट कोणत्या कायद्यानुसार घेतले जाते? लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ३४ (१)(अ) नुसार, लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना विशिष्ट रक्कम जमा करावी लागते, ज्याला अनामत रक्कम म्हणतात. 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग