UP Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहिचला आहे. दोन टप्प्यातील मतान झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मॅरेथॉन सभा घेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज बरेलीमध्ये घेतलेल्या सभेतून काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या इटली दौऱ्यावर निशाणा साधला.
काँग्रेसचा जाहीरनामा तुम्ही पाहिलाच असेल. इंडिया आघाडी स्वार्थाची आघाडी आहे. ही आघाडी देशाच्या हितासाठी योग्य नाही. पुलवामामध्ये आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा आनंद साजरा करणाऱ्या पाकिस्तानच्या एका माजी मंत्र्याने राहुल गांधींचे कौतुक केले. भारतात कोणीही त्यांची स्तुती करत नाही, कारण लोकांना माहित आहे की, जेव्हा भारतात संकट येते, तेव्हा राहुल गांधी सर्वात आधी इटलीला पळून जातात.
यावेळी त्यांनी देशातील आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, मागास, अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना दिलेल्या आरक्षणात कोणत्याही पक्षाला हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली भाजप-एनडीए सरकारने 'सबका साथ-सबका विकास' या भावनेने संपूर्ण देशात कोणताही भेदभाव न करता विकासाची कामे केली आहेत. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशातील जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. मोदी सरकारवर 140 कोटी देशवासीयांचा आशीर्वाद आहे, असा विश्वासही त्यांनी यावेली व्यक्त केला.
अनिल अंबानींच्या 'या' तीन कंपन्या विकल्या जाणार, कर्जबाजारी कंपन्यांचा खरेदीदार कोण?