Rahul Gandhi : "खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:07 PM2021-11-17T15:07:32+5:302021-11-17T15:20:23+5:30

Congress Rahul Gandhi And Modi Government : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

when there is punishment for speaking the truth it is clear that lies are in power says rahul gandhi | Rahul Gandhi : "खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे"

Rahul Gandhi : "खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे"

Next

नवी दिल्ली -  काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी 'राष्ट्रीय पत्रकारिता दिना'च्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे" असं म्हणत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 16 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय पत्रकारिता दिन' दरवर्षी साजरा केला जातो. याच दरम्यान राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं आहे. एक व्हिडीओ देखील ट्विटरवरून शेअर केला आहे. 

राहुल गांधींनी या व्हिडिओमध्ये त्रिपुरासहीत अनेक ठिकाणी पत्रकारांची अटक आणि हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 'खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे' असं म्हटलं आहे. याआधी देखील राहुल यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपली दिवाळी यंदा कन्याकुमारीच्या सेंट जोसेफ मॅट्रीक हायर सेकेंडरी स्कूलच्या विजिटर्ससोबत साजरी केली . यादरम्यान त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांसोबत संवाद साधला होता. यावेळी राहुल यांनी काही खास प्रश्नांची उत्तरं देखील दिली होती. 

पंतप्रधान झाल्यास सर्वात आधी कोणता निर्णय घ्याल?; राहुल गांधींनी दिलं उत्तर, म्हणाले...

राहुल गांधी यांनी विविध संस्कृतींचा हा संगम आपल्या देशासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण हे जपायला हवा असं म्हटलं होतं. याच दरम्यान एका व्यक्तीने राहुल गांधींना काँग्रेसचं सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून पहिला निर्णय काय घ्याल? अशा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधींनी महिला आरक्षण असं पटकन उत्तर दिलं. राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय महिला आरक्षणाबाबत असेल असं म्हटलं. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद करताना राहुल गांधी म्हणाले, जर कोणी मला विचारलं की मी माझ्या मुलांना काय शिकवेल, तर याचं उत्तर विनम्रता असं असेल. कारण विनम्रतेमुळेच तुम्हाला समज येते.

"मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा"

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. दिवाळीच्या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा देखील व्यक्त केली. "आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. तसेच आता सिलिंडरच्या दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. 
 

Web Title: when there is punishment for speaking the truth it is clear that lies are in power says rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.