PM Modi Tamilnadu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 एप्रिल 2025) तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये नव्याने बांधलेल्या पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. यानंतर एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांच्या द्रमुक पक्षावर भाषेचा वाद वाढवल्याबद्दल निशाणा साधला. "तामिळनाडूचे मंत्री तामिळ भाषेत अभिमानाने बोलतात, परंतु त्यांनी मला लिहिलेली पत्रे आणि त्यावरील स्वाक्षऱ्या केवळ इंग्रजीत आहेत. ते तमिळ भाषा का वापरत नाहीत? त्यांचा तमिळ भाषेचा अभिमान कुठे जातो?" असा बोचरा सवाल पीएम मोदींनी विचारला.
मेडिकलचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत शिकवातामिळनाडू सरकारला आवाहन करताना पीएम मोदी म्हणाले, "तामिळनाडूमध्ये 1400 हून अधिक जनऔषधी केंद्रे आहेत. येथे 80 टक्के सवलतीत औषधे उपलब्ध आहेत. यामुळे तामिळनाडूच्या लोकांची 7 हजार कोटी रुपयांची बचतही झाली आहे. देशातील तरुणांना डॉक्टर होण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासू नये, यासाठी तामिळनाडूमध्ये 11 वैद्यकीय महाविद्यालचे उघडण्यात आली. राज्यातील सर्वात गरीब विद्यार्थ्यालाही आता डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. मला तामिळनाडू सरकारला सांगायचे आहे की, त्यांनी तामिळ भाषेत वैद्यकीय अभ्यासक्रम जारी करावा, जेणेकरून इंग्रजी येत नसलेल्या गरीब कुटुंबातील मुलांनाही शिकता येईल"
तामिळनाडूचे रेल्वे बजेट 6 हजार कोटींपेक्षा जास्त"तामिळनाडूची क्षमता लक्षात घेतली तर देशाचा सर्वांगीण विकास होईल, असा माझा विश्वास आहे. 2014 पूर्वी रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी केवळ 900 कोटी रुपये मिळत होते. या वर्षी, तामिळनाडूचे रेल्वे बजेट 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि भारत सरकार देखील येथील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करत आहे. यामध्ये रामेश्वरम रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. विकसित भारताच्या प्रवासात तामिळनाडूचा मोठा वाटा आहे. माझा विश्वास आहे की, तामिळनाडूची क्षमता जितकी वाढेल, तितकीच भारताचा विकास होईल."
तामिळनाडूला केंद्राकडून मोठी मदतयावेळी पीएम मोदींनी राज्य सरकारला दिल्या जाणाऱ्या मदतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "2014 च्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट निधी दिला आहे. तामिळनाडूच्या पायाभूत सुविधांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. राज्याच्या रेल्वे अर्थसंकल्पात गेल्या दशकात सात पटीहून अधिक वाढ झाली आहे. ही लक्षणीय वाढ असूनही, काही लोक कोणतेही समर्थन न करता फक्त तक्रार करतात."