आठ-नऊ महिन्यांपासून वेटोळे घालून बसलेल्या कोरोनामुळे जग अगदीच घायकुतीला आले आहे. त्यामुळे कोणती लस किती प्रभावी यापेक्षा ती कधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ११ डिसेंबरपासून अमेरिकेत लसीकरणाची मोहीम करणार असल्याचे तेथील प्रशासनाने जाहीर करणे हे सगळेच अगदी झटपट घडले आहे. पाहू या कोणती लस किती प्रभावशाली आहे... ती कोण बनवतेय... कोणाकडे लसीकरणाचा काय आणि कसा कार्यक्रम आहे...
कोणाची लस किती प्रभावी
चार कंपन्यांनी त्यांची लस किती प्रभावी आहे, हे जाहीर केले आहे. त्यांची किंमतही जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे.
प्री-क्लिनिकल स्टेज या टप्प्यात प्राणी आणि झाडांवर लसीचा प्रयोग करून पाहिला जातोपहिला टप्पाया टप्प्याला सेफ्टी ट्रायल असे म्हटले जाते. माणसांच्या एका छोट्या समूहावर लसीचा प्रयोग.
दुसरा टप्पाया टप्प्याला लार्ज ग्रुप ट्रयल म्हटले जाते. १०० हून अधिक लोकांमध्ये लस टोचली जाते.
तिसरा टप्पाहा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यात ४० ते ५० हजार लोकांवर लसीचा प्रयोग.
अप्रूव्हल स्टेज वरील सर्व टप्पे यशस्वीपणे पार पडले की मग लसीच्या उत्पादनाला मंजुरी मिळते
उत्पादनहा अखेरचा टप्पा. क्लिनिकल ट्रायल आणि नियामक मंजुरीनंतर लस उत्पादनासाठी सज्ज होते
लसीकरणउत्पादनानंतर विविध देशांमध्ये लसीकरण मोहीम राबवली जाते.
भारत मार्च-फेब्रुवारी , २०२१ केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस उपलब्ध होईल. सप्टेंबर, २०२१ पर्यंत २५ ते ३० कोटी भारतीयांना लस टोचली जाईल
युनिसेफनही केली तयारीयुनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) लसीच्या वाहतुकीसाठी ३५० एअरलाइन्स आणि कार्गो फ्लाइट कंपन्यांशी चर्चा केली आहे. अफगाणिस्तान, येमेन, बुरूंडी यांसारख्या गरीब देशांमध्ये युनिसेफ कोरोना प्रतिबंधक लसींचे वितरण करणार आहे.