शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महाराष्ट्रात निवडणुका कुठंयत?; कोरोनावाढीला निवडणुकांशी जोडणं चुकीचं; अमित शाह यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 5:47 PM

Coronavirus : सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या चोवीस तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची झाली नोंद

ठळक मुद्देसध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंदगेल्या चोवीस तासांत अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची झाली नोंद

देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात पहिल्यांदाच २ लाख ६० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा लॉकडाऊन लागेल का असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. तर दुसरीकडे एकीकडे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आणि दुसरीकडे निवडणुकांची रॅली यावरही अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला निवडणुकांशी जोडणं योग्य नसल्याचं म्हटलं. ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका झाल्या नाहीत त्या राज्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. "पाहा, महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? त्या ठिकाणी ६० हजार रुग्णांची नोंद होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार रुग्णांची नोंद होत आहे. महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे आणि पश्चिम बंगालसाठीही. या गोष्टीला निवडणुकांसोबत जोडणं योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. आता तुम्ही काय सांगाल?," असं अमित शाह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.  लॉकडाऊनवरही भाष्यमुलाखतीदरम्यान अमित शाह यांना गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? असा सवाल करण्यात आला. "आम्ही स्टेकहोल्डर्ससोबत चर्चा करत होते. सुरूवातीला लॉकडाऊन संदर्भातला उद्देश हा निराळा होता. आम्हाला पायाभूत सुविधा आणि उपचाराशी रुपरेषा तयार करायची होती. तेव्हा आमच्याकडे कोणतंही औषध किंवा लस नव्हती. परंतु आता परिस्थिती निराळी आहे. तरीही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. जो काही एकमतानं निर्णय होईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. परंतु सध्या घाईनं लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती दिसत नाही," असं अमित शाह उत्तर देताना म्हणाले.आपण यावर विजय मिळवू कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बरेच उपक्रम सुरू झाले होते. आणीबाणीच्या गोष्टी आता का नाहीत असा सवालही अमित शाह यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "हे खरे नाही. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दोन बैठका झाल्या आणि त्यावेळी मीही हजर होतो. नुकतीच सर्व राज्याच्या राज्यपालांसोबतही बैठक पार पडली. सर्व सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील भागधारकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमची बैठक झाली आहे." लसीकरणाबाबत आमची वैज्ञानिकांशी चर्चा झाली आहे आणि प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठीही एक बैठक झाली आहे. यासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. यावेळी कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे. परंतु यावर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास असल्याचं शाह म्हणाले. प्रत्येक जण चिंताग्रस्त"कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सर्वजण चिंताग्रस्त आहेत. मलाही त्याची चिंता आहे. आपले वैज्ञानिक यासोबत लढण्यासाठी काम करत आहेत. आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं वाटतंय. अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. वैज्ञानिक यावर अभ्यास करत आहेत आणि यावर वेळेपूर्वीच निष्कर्ष काढला जाईल," असा विश्वासही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाMaharashtraमहाराष्ट्रwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या