‘कुठे आहेत नोकऱ्या?’ हा भारतीयांचाही सवाल आहे; राहुल गांधींचा गडकरींना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:56 AM2018-08-07T04:56:50+5:302018-08-07T04:57:01+5:30

कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.

'Where are the jobs?' This is also the question of Indians; Rahul Gandhi plots Gadkari | ‘कुठे आहेत नोकऱ्या?’ हा भारतीयांचाही सवाल आहे; राहुल गांधींचा गडकरींना टोला

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ हा भारतीयांचाही सवाल आहे; राहुल गांधींचा गडकरींना टोला

Next

नवी दिल्ली : कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाची मागणी अन्य समाजांकडूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे पत्रकारांनी शनिवारी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन
गडकरी म्हणाले होते की, एक क्षण असे समजू की या सर्वांना आरक्षण दिले पण सध्या नोकºयाच उपलब्ध नाहीत. माहिती तंत्रज्ञानामुळे बँकेतील नोकºया कमी झाल्या आहेत. सरकारी पदांसाठी होणारी भरतीही थांबली आहे. त्यामुळे कुठे आहेत नोकºया अशी अवस्था आहे. गडकरींच्या या उद्गारांवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, गडकरी यांनी उपस्थित केलेला प्रश्न वाजवी आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे. गडकरींच्या उद्गारांची वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीही या टिष्ट्वटसोबत त्यांनी जोडली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता मात्र त्यांना सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अजिबात करता आलेली नाही अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे.

Web Title: 'Where are the jobs?' This is also the question of Indians; Rahul Gandhi plots Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.