कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 06:20 PM2023-06-17T18:20:06+5:302023-06-17T18:21:05+5:30

या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

Where did the Rs 500 notes go?; 88000 crores printed is not counted, what happened? | कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

googlenewsNext

मुंबई - ५०० रुपयांच्या नोटा अचानक बाजारातून गायब झाल्यात. जवळपास ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा कुठे गेल्यात हा प्रश्न उभा राहिला आहे. गायब झालेल्या या पैशाचा हिशोब लागत नाही. RBI ने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ मिलियन नोटा छापल्या होत्या. परंतु बँकांकडे सध्या ७२६० मिलियन नोटाच आहेत. म्हणजे जवळपास १७६ कोटी ५०० रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या नोटांची किंमत तब्बल ८८ हजार कोटी आहे. हा खुलासा RTI च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. 

नोटा छपाई देशात फक्त ४ ठिकाणी होते. देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी इथं आरबीआय नोटा छपाईचे काम करते. अशात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकच्या प्रेसमधून २१० मिलियन ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. Free Press Journal रिपोर्टनुसार, आरटीआयमधून ही बाब उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी या नोटांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रिपोर्टनुसार, आरटीआयच्या माध्यमातून मनोरंजन रॉय यांनी गायब झालेल्या नोटांबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार, २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकमध्ये ३७५.४५० मिलियन ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. परंतु RBI च्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ मिलियन नोटा आहेत. २०१५-२०१६ या काळात रघुराम राजन हे RBI चे गर्व्हनर होते. RTI मध्ये एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात २१० मिलियन नोटा छापल्या गेल्याचे सांगितले ज्या RBI ला पाठवण्यात आल्यात. तर नाशिकमधील प्रेसने सांगितले की, आम्ही नवीन ५०० च्या नोटा सेंट्रल बँकेला पाठवल्या होत्या. परंतु याचा उल्लेख RBI च्या वार्षिक रिपोर्टमध्ये कुठेही नाही. 

अजित पवारांचा सरकारवर निशाणा
नोटांची छपाई झाली पण नोटा आरबीआयकडे पोहचल्या नाहीत. अशा हजारो कोटी नोटा गायब झाल्याची बातमी समोर आलीय. त्याबाबत अर्थ विभाग, आरबीआयनं लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. बनावट नोटा बाजारात आल्या, नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा असं सरकारने सांगितले होते. देशाच्या भल्यासाठी काय करायचे ते करू द्या, पण हे केल्यानंतर २ हजारांची नोट काढली, पुन्हा ती बंद केली. हा पोरखेळ सुरू आहे का? या बातमीत किती तथ्य आहे हे सरकारने सांगावे. काहीच सांगायला सरकार तयार नाही. जनतेचा अधिकार आहे. या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

Web Title: Where did the Rs 500 notes go?; 88000 crores printed is not counted, what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.