राजकीय नेते कुठे गुंतवतात आपला पैसा?; शपथपत्रातून गुपित आले समाेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:17 AM2024-04-08T06:17:54+5:302024-04-08T06:19:12+5:30
काेणी काेणता पर्याय निवडला? उमेदवारी अर्जासाेबतच्या शपथपत्रातून गुपित आले समाेर
नवी दिल्ली : विविध राजकीय पक्षाचे नेते वाजतगाजत शक्तिप्रदर्शन करीत आहेत. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट जाहीर केल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करीत आहेत. त्यानंतर चर्चा घडू लागली आहे त्यांच्या चल आणि अचल संपत्तीची. नेत्यांनी विविध पर्यायांमध्ये गुंतविलेल्या रकमेची माहिती या निमित्ताने बाहेर येऊ लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लहान कंपन्यांमधील गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडातही पैसे गुंतविले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मिडकॅप फंडांची निवड केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २०.२ कोटी, चंद्रशेखर यांच्याकडे २३.६ कोटी तर नितीन गडकरी यांच्याकडे ६.३ कोटींची संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रांतून समोर आली आहे.
केरळच्या वायनाड येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल गांधी यांनी पिडिलाईट इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्ससह २४ कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडात ३.८ कोटी गुंतविले आहेत तर गोल्ड बॉण्डमध्ये १५ लाख रुपये गुंतविले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केरळच्या तिरुवनंतपूरममधून निवडणुकीचा अर्ज भरला आहे. त्यांनी टिस्को कंपनीच्या घेतलेल्या शेअर्सची किंमत आता २ लाख इतकी झाली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडासह हुडको आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये ४५ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल करणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा पूर्ती पॉवर अँड शुगर कंपनीत पैसे गुंतविले आहेत. सहकारी संस्थांमध्येही त्यांनी पैसे गुंतविले आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशातील मेरठमधील उमेदवार रामायण मालिकेतून घराघरात पोहचलेले राम म्हणजे अरुण गोविल यांनी शेअर बाजारात १.२२ कोटी रुपये आणि म्युच्युअल फंडात १६.५१ लाखांची गुंतवणूक केली आहे.
नितीन गडकरी
शेअर्स किंमत (लाख रु.)
पूर्ती पॉवर अँड शुगर ०.००३१
सहकारी संस्था व इतर २
अन्य गुंतवणूक २
राहुल गांधी
बॅंकांमध्ये ठेवी (लाख) ₹२६.२५
यंग इंडियनचे शेअर्स (लाख) ₹१.९०
शेअर्स (काेटी) ₹४.३३
म्युच्युअल फंड (काेटी) ₹३.८१
साॅवरेन गाेल्ड बाॅंड (लाख) ₹१५.२१
शासकीय बचत याेजना (लाख) ₹६१.५२
साेने (लाख) ₹४.२०
व्यावसायिक गाळे (काेटी ₹९.०४
राजीव चंद्रशेखर
बॅंकांतील ठेवी
१०.३८ काेटी रुपये,
साेने
३.२५ काेटी रुपये
बॅंकांतील ठेवी
(पत्नीच्या नावे)
६०.५५
शेअर्स व म्युच्युअल फंड (पत्नीच्या नावे)
५.३२
शशी थरुर
४९.३ काेटींची गुंतवणूक व ठेवी.
मुदत ठेवी : ९.२७ काेटी रुपये
म्युच्युअल फंड : १.४४ काेटी रुपये
सरकारी राेखे : ६८ लाख
साेने : ३२ लाख रुपये
परदेशात : १४.८५ कोटींची गुंतवणूक