शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

राजकीय नेते कुठे गुंतवतात आपला पैसा?; शपथपत्रातून गुपित आले समाेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 6:17 AM

काेणी काेणता पर्याय निवडला? उमेदवारी अर्जासाेबतच्या शपथपत्रातून गुपित आले समाेर

नवी दिल्ली : विविध राजकीय पक्षाचे नेते वाजतगाजत शक्तिप्रदर्शन करीत आहेत. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट जाहीर केल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अर्ज दाखल करीत आहेत. त्यानंतर चर्चा घडू लागली आहे त्यांच्या चल आणि अचल संपत्तीची. नेत्यांनी विविध पर्यायांमध्ये गुंतविलेल्या रकमेची माहिती या निमित्ताने बाहेर येऊ लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लहान कंपन्यांमधील गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडातही पैसे गुंतविले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मिडकॅप फंडांची निवड केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे २०.२ कोटी, चंद्रशेखर यांच्याकडे २३.६ कोटी तर नितीन गडकरी यांच्याकडे ६.३ कोटींची संपत्ती असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रांतून समोर आली आहे. 

केरळच्या वायनाड येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल गांधी यांनी पिडिलाईट इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्ससह २४ कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडात ३.८ कोटी गुंतविले आहेत तर गोल्ड बॉण्डमध्ये १५ लाख रुपये गुंतविले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी  केरळच्या तिरुवनंतपूरममधून निवडणुकीचा अर्ज भरला आहे. त्यांनी टिस्को कंपनीच्या घेतलेल्या शेअर्सची किंमत आता २ लाख इतकी झाली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडासह हुडको आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये ४५ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल करणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा पूर्ती पॉवर अँड शुगर कंपनीत पैसे गुंतविले आहेत. सहकारी संस्थांमध्येही त्यांनी पैसे गुंतविले आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशातील मेरठमधील उमेदवार रामायण मालिकेतून घराघरात पोहचलेले राम म्हणजे अरुण गोविल यांनी शेअर बाजारात १.२२ कोटी रुपये आणि म्युच्युअल फंडात १६.५१ लाखांची गुंतवणूक केली आहे.

नितीन गडकरी शेअर्स                 किंमत (लाख रु.) पूर्ती पॉवर अँड शुगर    ०.००३१ सहकारी संस्था व इतर    २अन्य गुंतवणूक    २ 

राहुल गांधीबॅंकांमध्ये ठेवी (लाख)        ₹२६.२५यंग इंडियनचे शेअर्स (लाख)    ₹१.९०शेअर्स (काेटी)        ₹४.३३म्युच्युअल फंड (काेटी)        ₹३.८१साॅवरेन गाेल्ड बाॅंड (लाख)        ₹१५.२१शासकीय बचत याेजना (लाख)    ₹६१.५२साेने (लाख)        ₹४.२०व्यावसायिक गाळे (काेटी        ₹९.०४

राजीव चंद्रशेखर बॅंकांतील ठेवी    १०.३८ काेटी रुपये,साेने३.२५ काेटी रुपयेबॅंकांतील ठेवी (पत्नीच्या नावे)६०.५५शेअर्स व म्युच्युअल फंड (पत्नीच्या नावे)    ५.३२

शशी थरुर

४९.३ काेटींची गुंतवणूक व ठेवी.मुदत ठेवी : ९.२७ काेटी रुपयेम्युच्युअल फंड : १.४४ काेटी रुपयेसरकारी राेखे : ६८ लाखसाेने : ३२ लाख रुपयेपरदेशात : १४.८५ कोटींची गुंतवणूक

टॅग्स :ElectionनिवडणूकMONEYपैसाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीRahul Gandhiराहुल गांधी