नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर झाल्यापासून या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारणास सुरुवात झाली आहे. एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोला भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींना लगावला आहे.ओवेसींनी केलेले ट्विट रिट्विट करत तेजस्वी सूर्या म्हणाले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या अधिकृत निवासस्थानी इफ्तार पार्टींचे आयोजन करायचे तेव्हा तुमची धर्मनिरपेक्षता कुठे होती. मंदिर पाडून मशीद बांधली गेली होती. ती चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल