नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याला सध्या एका प्रश्नाने भंडावून साेडले आहे. ताे म्हणजे, भारतीयांनी स्वीस बँकेमध्ये लपवलेला काळा पैसा गेला कुठे? हाेय. हे खरे आहे. स्वीस बँकांमध्ये लाखाे काेटी रुपयांचा काळा पैसा लपवणाऱ्यांची यादी काही वर्षांपूर्वी लीक झाली हाेती. मात्र, या बँकांमध्ये हा पैसा राहिलेला नाही. त्याचाच शाेध घेण्याचे काम प्राप्तिकर खात्यातर्फे सुरू आहे.एचएसबीसी बँकेच्या जिनेव्हा येथील मुख्यालयातील खात्यांमध्ये काही भारतीयांनी प्रचंड पैसा साठवून ठेवला हाेता. अशा खातेदारांची यादी २०१०मध्ये बँकेच्या एका कर्मचाऱ्याने लीक केली हाेती. त्यानंतर फ्रान्स सरकारनेही २०११ - १२मध्ये एक यादी भारताला दिली हाेती. अशा सुमारे २४ हजार खातेधारकांची नावे त्यात हाेती. प्राप्तिकर खात्याने त्यांना नाेटीस पाठविल्या हाेत्या. परदेशातील संपत्ती, निधी, मालकी इत्यादींबाबत ७ ते ९ वर्षांची माहिती प्राप्तिकर खात्यातर्फे मागविण्यात आली हाेती. मात्र, या खात्यांमधील पैसा इतरत्र वळविण्यात आला आहे. काही जणांनी खाते असल्याचे नाकारले आहे. तसेच काहींनी त्या कालावधीत अनिवासी भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याने त्यांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, पासपाेर्ट इत्यादी माहितीही मागविली आहे. (वृत्तसंस्था)पैसा वळविला कुठे?नाेटीस मिळाल्यानंतर हे नागरिक अनिवासी भारतीय तर झाले नाहीत ना? याचा शाेध घेण्यात येत आहे. तसेच परदेशातील मालमत्तेची माहिती मागविल्यामुळे नाेटीस मिळाल्यानंतर पैसा इतरत्र वळविण्यात आला की नाही, याचीही माहिती मिळेल.
भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 4:25 AM