शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोणी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, संपूर्ण देशात ठरलेय; खर्गेंचाही एकट्याने लढण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 6:36 PM

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत.

पंजाबच्या खन्नामध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकर ७ही लोकसभेच्या जागा आपला देतील असे म्हणाले होते. यावरून आतापर्यंत शांत बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया आली आहे. लुधियानातील समरालामध्ये खर्गे यांनी कोणी सोबत आले तर ठीक, नाही तरी ठीक, एकट्यानेच निवडणूक लढवू असे वक्तव्य केले आहे. 

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे अनेक ठिकाणी एकटे लढत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इंडिया आघाडीची निवडणुकीपूर्वीच शकले झाली आहेत. असे असताना आता उरली सुरली आघाडीपण तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. चार महिन्यांपूर्वी एकजूट दाखविणारे विरोधी पक्ष कॅरमच्या सोंगट्यांप्रमाणे विखुरले आहेत. त्यांचा मुखिया तर भाजपासोबत जाऊन बसला आहे. केजरीवाल यांनी पंजाब, चंदीगडमध्ये एकट्याने निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. दिल्लीतही आजचे त्यांचे वक्तव्य काँग्रेसला बाजुलाच ठेवण्याचे आहे. यामुळे आता काँग्रेसनेही तलवार उपसली असून खर्गे यांनी देखील एकट्याच्या जिवावर लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 

पंजाबमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आपसोबत आघाडी न करण्याची मागणी हायकमांडकडे केली होती. आपसोबत आघाडी करून लढल्यास त्याचा तोटाच होईल असे या नेत्यांचे म्हणणे आहे. 

मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी उभी राहिली होती. कुठे कुठे आघाडी योग्य दिशेने सुरु आहे. काही ठिकाणी जुळत नाहीय. आता आम्हाला लढायचे आहे, हे समजून घ्या, असे खर्गे यांनी कार्यकर्त्यांना म्हटले आहे. शेवटपर्यंत लढून विजय मिळवायचा आहे. कोणी आले तरी ठीक आहे, कोणी नाही आले तरी ठीक आहे. संपूर्ण देशात आम्ही हा निर्णय घेतला आहे. हे फक्त पंजाबचे नाही. खंबीरपणे लढावे लागेल, असे खर्गे म्हणाले. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी