शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

ऑनलाइन व्यवहारांसाठी कोणते कार्ड वापरावे?; सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य खबरदारी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 7:55 AM

आपण डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते पाहणे योग्य ठरेल.

दरवर्षी जगभर १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जात असतो. यावर्षीच्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्यादृष्टीने डिजिटल व्यवहारांमधली सुरक्षितता हा विषय निवडण्यात आला आहे. डिजिटल फायनान्समुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मागे राहण्याची शक्यता असते. 

आपल्या भोवतालच्या आर्थिक व्यवहारांच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेले आहेत. संगणकीय प्रणालीच्या आधारे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढायला लागले आहे. इतर पद्धतींमध्ये व्यवहारांमधले दोन्ही पक्ष एकमेकांना माहिती असतात, प्रसंगी ते एकमेकांच्या समोरदेखील असतात. डिजिटल व्यवहारांमध्ये मात्र ते एकमेकांच्या समोर नसतात, प्रसंगी ते विश्वासार्ह देखील नसतात. अशावेळी सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर आपण डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ते पाहणे योग्य ठरेल. आपली आर्थिक विवरणे नियमितपणे तपासणे आवश्यक मानले पाहिजे. आपण ज्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून व्यवहार करणार आहोत, त्यासाठी सायबर सुरक्षेच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी आवश्यक ठरते. 

अलीकडच्या व्यवहारात लॉग इन आणि व्यवहारासाठीचा असे दोन पासवर्ड्स, कापचा, तसेच आपल्या रजिस्टर्ड  मोबाईलवर येणारा वनटाईम ओटीपी अशा प्रकारच्या अनेक सुरक्षाप्रणाली वापरलेल्या असतात. आपले पासवर्ड्स आपण वरचे वर बदलले पाहिजेत. आपण आपले व्यवहार करण्यासाठी जे ॲप्स वापरतो आहोत, ते भरवशाचे आणि खात्री असणारे असावेत. ज्या खात्यावर जास्त शिल्लक रक्कम असते, त्या बँक खात्याशी भीम किंवा पेटीएमसारखे ॲप्स लिंक करू नयेत. शक्यतोवर डेबिट कार्डाचा वापर करू नये.

क्रेडिट कार्डाला मर्यादित रकमेचे बंधन असते. त्यामुळे कार्ड हॅक झाले किंवा त्याचे क्लोनिंग झाले, तर धोका कमी असतो. अनेकदा बँकांच्या नावाने फोन येतो आणि आपल्याला खात्याचा पिन नंबर, पासवर्ड मागितला जातो.  कोणतीही बँक आपल्या खातेदारांकडून त्यांच्या बँक खात्याबद्दलची गोपनीय स्वरूपाची माहिती कधीही मागवीत नाही. आपण सावध राहिलो, तरच त्यातून आपण वाचू शकतो. आजच्या ग्राहक दिनाचा हाच संदेश आहे.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी