कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या नव्या उत्परिवर्तनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. सद्य:स्थितीत या नव्या उत्परिवर्तनाचे बाधित किरकोळ संख्येत असले तरी त्याचे तिसऱ्या लाटेत रुपांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या नव्या उत्परिवर्तनावर लसीचे एकत्रित डोस (मिक्सिंग) प्रभावी ठरू शकतील, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रमुखांचे म्हणणे आहे.
काय आहे ‘एम्स’प्रमुखांचे म्हणणे?nडेल्टा प्लस हे कोरोनाचे नवे उत्परिवर्तन अधिक आक्रमक असून त्याच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. nया उत्परिवर्तनाला रोखण्यासाठी लसींच्या एकत्रित मात्रा (मिक्सिंग डोस) देणे हा एक पर्याय ठरू शकतो. nपरंतु त्यासाठी कोणत्या लसींचे मिश्रण अधिक योग्य ठरेल यासंदर्भातील डेटाची गरज भासणार आहे, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. nगेल्या आठवड्यात केंद्र सरकारने उत्परिवर्तनाविरोधात लसींच्या एकत्रिकरणाला अधिक प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले होते. nलसमात्रांच्या मिश्रणाचे प्रयोग इतरही देशांमध्ये सुरू आहेत.
nडेल्टा उत्परिवर्तनाविरोधात लसीची एकच मात्र पुरेशी नाही, असेही डॉ. गुलेरिया यांचे म्हणणे आहे.nसंशोधनातही एकच मात्रा केवळ ३३ टक्क्यांपर्यंतच प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. nदोन्ही मात्रा दिल्यानंतर ९० टक्के लाभार्थी सुरक्षित होतात. nत्यामुळे डेल्टा उत्परिवर्तनावर लसीच्या दोन मात्राच परिणामकारक ठरतील. nडेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे.
लसमात्रा मिश्रणावर आतापर्यंत दोन अहवाल
nदोन लसींच्या मात्रांचे मिश्रण तयार करून त्यांचा डोस बनविण्याच्या प्रयोगावर आतापर्यंत दोन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. nत्यातील एक लॅन्सेटच्या गेल्या महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाला. दोन लसींच्या मिश्रणात एका समूहाला पहिला डोस कोविशील्डचा देण्यात आला तर दुसरा डोस फायझरच्या लसीचा देण्यात आला. त्यातील काहींवर सौम्य दुष्परिणाम जाणवले. परंतु दोन लसींच्या मिश्रणाचा पूर्ण डेटा मिळणे अद्याप बाकी आहे.
nदुसरा प्रयोग स्पेनमध्ये करण्यात आला. त्यात कोविशील्ड आणि फायझर लस यांच्या मिश्रणाचा समावेश होता. या मिश्र लसी प्रभावी असल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले. nत्यामुळे डेल्टा प्लसवर दोन लसींचे मिश्रण प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.