तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 07:49 AM2024-05-12T07:49:54+5:302024-05-12T07:51:08+5:30
पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली.
नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे आटाेपले असून चाैथ्या टप्प्यासाठी १३ मे राेजी मतदान आहे. प्रत्येक टप्प्यागणित राजकीय वातावरण तापू लागले. पहिल्या दाेन टप्प्यांच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्ष व नेत्यांनी प्रचारात जाेर लावला. त्यांच्या प्रचारसभा आणि रॅलीची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली.
तिसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याच्या तुलनेत कमी दिवस असूनही पंतप्रधान नरेंद्र माेदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या ८६ सभा व रॅली झाल्या. ३१ मार्चपासून खऱ्या अर्थाने लाेकसभेच्या प्रचारास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १८, दुसऱ्या टप्प्यात ७ तर तिसऱ्या टप्प्यात ११ दिवस मिळाले.
काेणाचा फाेकस कुठे?
पंतप्रधान माेदींच्या १७ टक्के सभा केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये झाल्या. तर ४० टक्के सभा उत्तर भारतात हिंदी भाषिक राज्यांत झाल्या. शाह यांच्याही बहुतांश सभा उत्तर भारतात झाल्या.
राहुल गांधी यांच्या ५८ टक्के तर प्रियंका यांच्या ३३ टक्के सभा दक्षिण भारतात झाल्या. या भागात त्यांचा जाेर हाेता त्यातही राहुल यांच्या १३ आणि प्रियंका यांच्या सर्वाधिक ६ सभा केरळमध्ये झाल्या.
काेणत्या पक्षाचे किती राेड शाे?
भाजप १५९ काॅंग्रेस ६९
३१ मार्च ते ५ मेपर्यंत झालेला प्रचार
कालावधी माेदी शाह राहुल प्रियंका एकूण
३१ मार्च ते १७ एप्रिल ३१ १८ २१ ९ ७९
१८ एप्रिल ते २४ एप्रिल १६ २९ ०८ १० ६३
२५ एप्रिल ते ५ मे ३९ २९ ११ १० ८६