नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका ८१ वर्षीय महिलेला ब्रेन हॅमरेज झाला होता. तसेच तिला ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली आणि मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात असताना अचानक त्या महिलेचे डोळे उघडल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे नातेवाईकांना धक्काच बसला.
सदर प्रकरण फिरोजाबादच्या जसराना शहरातील बिलासपूरचे आहे. येथील रहिवासी असलेल्या हरिभेजी (८१) यांना २३ डिसेंबर रोजी आजारपणामुळे फिरोजाबादच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ट्रॉमा सेंटरमध्ये मंगळवारी हरिभेजी यांच्या मेंदू आणि हृदयाने काम करणे बंद केले. त्यामुळे डॉक्टरांनी तिचा आता वैद्यकीयदृष्ट्या मृत्यू झाला असल्याचे घोषित केले होते.
आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात
हरिभेजीना मृत घोषित केल्यानंतर तिचा मुलगा सुग्रीव सिंह आपल्या आईला मृत समजून अंतिम संस्कारासाठी जसराना येथे घेऊन जात होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांनाही देण्यात आली, मात्र वाटेत सिव्हिल लाईन ते माखनपूर दरम्यान अचानक हरिभेजी यांचे डोळे उघडले. डॉक्टर आपल्याशी चुकीचे बोलले, ती जिवंत आहे, असे नातेवाइकांना वाटले.
हरिभेजींनी डोळे उघडल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर काही वेळेनंतर हरिभेजींनीही चमच्याने चहा प्यायल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्याची प्रकृती खराब होती, पण तिचा मृत्यू झाला नव्हता. त्यांच्या कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य अजूनही जिवंत असल्यानं कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला. मात्र पुन्हा मेंदू आणि हृदयाने आधीच काम करणे बंद केल्याने हरिभेजींचे बुधवारी निधन झाले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिभेजी यांचा मुलगा सुग्रीव सिंह सांगतात की, डॉक्टरांनी त्यांना मंगळवारीच मृत घोषित केले होते, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईचा मृत्यू झाला.