... तर 'किल्ले रायगड' जगातील आठवे आश्चर्य ठरेल, अमोल कोल्हेंची संसदेत 'शिव'गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 07:22 PM2019-06-24T19:22:49+5:302019-06-24T19:25:35+5:30
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून डॉ. अमोल कोल्हेंनी किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी संसदेत पहिलाच प्रश्न किल्ले रायगडाचा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 व्या शतकात किल्ले रायगडाची उभारणी केली. त्यांसह अनेक किल्लेही महाराजांनी बांधले. महाराजांनी या वास्तू ना स्वत:च्या नावे केल्या, ना कुटुंबातील व्यक्तींच्या. शिवाजी महाराजांनी हे किल्ले रयतेची संपत्ती म्हणून जपले. त्यामुळे या किल्ल्याची पुन्हा नव्याने उभारणी व्हावी, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी संसदेत केली.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून डॉ. अमोल कोल्हेंनी किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. जर, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विचार होत असेल, तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड याचाही विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड याची शासनाने जपणूक केल्या, यास राजधानी केल्यास, ते जगातील आठवे आश्चर्य ठरेल, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन खासदार बनले आहेत. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकांमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे शिव-शंभू भक्त म्हणून कोल्हे यांची महाराष्ट्राला ओळख आहे.