पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:00 PM2024-10-11T17:00:40+5:302024-10-11T17:01:23+5:30
Uttarakhand News: पॅराग्लायडिंग (Paragliding) करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे.
पॅराग्लायडिंग करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध टिहरी तलावाच्या परिसरामध्ये एक तरुण पॅराग्लायडिंगचा आनंद घेत होता. त्याचवेळी त्याच्या पॅराशूटचा तोल गेला आणि तो तरुण पॅराग्लायडरसह थेट तलावात पडला. मात्र या घटनेबाबत माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि या तरुणाचे प्राण वाचवले. दरम्यान, या बचाव मोहिमेचे व्हिडीओ स्थानिक लोकांनी चित्रित केले असून, ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार येथे पॅराग्लायडिंगचं प्रशिक्षण सुरू होतं. त्याचदरम्यान टिहरी गढवाल येथे असलेल्या प्रसिद्ध टिहरी तलावाजवळ ही दुर्गटना घडली. पॅराग्लायडिंग करत असताना एका तरुणाच्या पॅराशूटचा तोल गेला आणि तो थेट तलावात कोसळला. त्यानंतर एसडीआरएफच्या पथकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सदर तरुणाला तलावातून बाहेर काढले.
या दुर्घटनेत बचावलेला ऋषी हा तरुण नैनीताल येथील रहिवासी आहे. तलावात पॅराशूट कोसळल्याची माहिती मिळताच एसडीआरएफच्या बचाव पथकाने तातडीने बोटच्या मदतीने सदर तरुणाला तलावातून बाहेर काढले.