नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच या विमानांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना प्रशिक्षण देणे यासह इतर पावले उचलत भारतीय हवाई दलाने या नव्या विमानांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.दसॉल्ट अॅव्हिएशन या कंपनीकडून ३६ राफेल विमाने घेण्याचा ५८ हजार कोटी रुपयांचा करार भारताने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्स सरकारशी केला. आधीचा करार बदलून मोदी सरकारने विमानांची अव्वाच्या सव्वा वाढीव किंमत मान्य केली व हे करत असताना प्रस्थापित प्रक्रियांना बगल दिली गेली, असा काँग्रेसचा आरोप आहे.सरकारी सूत्रांनुसार अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्त्रे व क्षेपणास्त्रे घेऊन उड्डाण करण्याची आणि ती अचूकपणे डागण्याची क्षमता असलेल्या राफेल विमाने पुढील वर्षी सप्टेंबरपासून भारताच टप्प्याटप्प्याने पुरविली जायची आहेत. करार झाल्यापासून ६७ महिन्यांत सर्व ३६ विमाने पुरविली जाणार आहेत. दसॉल्ट कंपनी भारताला हव्या तशा शस्त्रांसाठी विमानांमध्ये फेरबदल करून देणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अधिकाºयांनी या आधीच फ्रान्सला जाऊन आपल्याला नेमके काय हवे ते दसॉल्ट कंपनीला कळविले आहे.सूत्रांनुसार पहिली राफेल विमाने मिळायला अजून एक वर्ष असले, तरी ही विमाने हाती येताच लगेच ती सक्रिय सेवेत रुजू करता यावीत, यासाठी हवाई दलाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यात या विमानांच्या स्थायी तळासाठी पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना ही विमाने चालविण्याचे प्रशिक्षण देणे या गोष्टींचा समावेश आहे. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने याआधीच ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.>सीमेवर दोन स्वॉड्रनराफेल विमाने हवाईदलात दाखल झाल्यावर त्यांच्या दोन स्वॉड्रन पश्चिम आणि पूर्व सीमेवर मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्याची तयारीही सुरू झाली आहे. पहिली स्वॉड्रन भारत-पाक सीमेपासून अवघ्या २२० किमी अंतरावर असलेल्या अंबाला येथे असेल. दुसरी स्वॉड्रन प. बंगालमधील हासिमारा हवाईतळावर तैनात करण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी राफेल विमानांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्याचे व दुरुस्ती आणि देखभालीची व्यवस्था करण्याचे कामही सुरू झाले आहे.
वादंग सुरू असतानाच राफेल स्वागताची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 4:26 AM