नवी दिल्ली : व्हॉट्सअप, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाणीद्वारे ठार मारण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांमध्ये काही दिवसांत घडल्या आहेत. या हिंसाचारामुळे आम्हीही भयभीत झालो आहोत, असे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले आहे.समाजमाध्यमांचा वापर करुन पसरविल्या जाणाºया खोट्या व डोकी भडकविणाºया संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअॅपला मंगळवारी दिला होता. सदर प्रकरणी या कंपन्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असेही सरकारने सुनावले होते.या इशाºयाची गंभीर दखल घेत व्हॉट्सअपने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे की, समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाºया अफवा, खोटी माहिती यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्या, केंद्र सरकार व नागरिकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांच्या सुरक्षिततेची कंपनीला काळजी असल्याने त्यादृष्टीनेच व्हॉट्सअपची रचना केली आहे. त्यानुसार लोक सुरक्षित राहाण्यासाठी आवश्यक ती माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळवू शकतात. नको असलेली माहिती डिलिट करु शकतात. त्याचबरोबर या अॅपचा गैरवापर टाळण्यासाठी लोकांनी सजग राहाण्याकरिता काही तांत्रिक सोयीही त्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत.तपासासाठी केले सहकार्यअफवा व खोट्या माहितीचा आपल्या अॅपद्वारे प्रसार होऊ नये म्हणून आजवर काय पावले उचलण्यात आली याची माहिती व्हॉट्सअॅपने या निवेदनात दिली आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधित यंत्रणांना व्हॉट्सअपने सक्रिय सहकार्य केले आहे.- अफवांमुळेच मुले पळविणाºया टोळीच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जमावाने केलेल्या मारहाणीत पाच निरपराधांचा बळी गेला होता. देशात विविध ठिकाणी झालेल्या जबर मारहाणीत गेल्या काही महिन्यांत २० जण मरण पावले आहेत.
देशामधील जबर मारहाणीच्या प्रकारांनीे व्हॉट्सअपही ‘भयभीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 4:26 AM