कुजबूज
By admin | Published: August 11, 2015 10:23 PM
सारे काही एका फाईलसाठी
सारे काही एका फाईलसाठीसध्या मडगाव पालिकेचा तांत्रिक विभाग अडचणीत सापडला आहे. आता ही अडचण सामान्य मडगावकरामुळे त्यांना आलेली नाही. मात्र, ही अडचण काही नगरसेवकांमुळेच आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या तांत्रिक विभागात म्हणे खारेबांद भागातील एक फाईल अडकून पडली आहे. आणि ही फाईल त्वरित हातावेगळी करावी यासाठी काही नगरसेवकच तांत्रिक विभागाच्या अधिकार्यावर दबाव आणू लागले आहेत. मुळात हे बांधकाम करताना काही प्रमाणात बेकायदेशीरपणा झाला असल्यामुळे ही फाईल क्लिअर करण्यास तांत्रिक विभाग तयार नाही. सध्या जैका प्रकरणामुळे सरकारी अधिकारी गोत्यात आल्याचे पाहून मडगाव पालिकेचे हे अधिकारीही अशा प्रकारचे ताक फुंकून पिऊ लागले आहेत. एरव्ही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात, असे सांगणारे हे नगरसेवक याच फाईलच्या मागे का लागले आहेत याचे कोडे मात्र अजूनही सुटलेले नाही.मुछे हो तो!चर्चिल आलेमाव यांच्या अटकेनंतर बाणावली भागात एका वेगळ्य़ाच चर्चेला ऊत आला आहे आणि या चर्चेचे सेंटर पॉइंट ठरले आहेत एकेकाळी बाणावलीच्या राजकारणात सक्रिय असलेले, मात्र आता अलिप्त असलेले आलेमाव यांचेच एकेकाळचे सर्मथक नीलेश प्रभूदेसाई. काही वर्षांपूर्वी याच प्रभूदेसाई यांनी आपल्या मिशा शिखर धवन टाईप वाढवल्या होत्या आणि ते एकाच बाजूच्या मिशीला पीळ देत होते. त्या वेळी झालेल्या एका कार्यक्रमात प्रभूदेसाई बोलूनही गेले होते, ‘ज्या वेळी भाजप सरकार चर्चिल आलेमाव यांना अटक करेल त्याच दिवशी मी दुसर्या बाजूच्या मिशीलाही पीळ देईन. काही वर्षांपूर्वी असंभव वाटणारी ही गोष्ट आता पार्सेकर सरकारने संभव करून दाखवली आहे. त्यामुळे नीलेशराव आपल्या मिशीला पीळ देतील का हे पाहावे लागेल.देखाव्यापुरती देखरेख समितीबाळ्ळी आरोग्य केंद्रावर देखरेख करण्यासाठी निवडण्यात आलेल्या समितीची आजवर एकही बैठक झालेली नाही. कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक यांचे स्वीय साहाय्यक असलेले दिनेश अवदी हेच या समितीचे अध्यक्ष आहेत. आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही देखरेख समिती निवडल्यानंतर समितीच्या एकाही सदस्याने या आरोग्य केंद्राच्या समस्येसंदर्भात माहिती जाणून घेतली नाही. त्यामुळे समिती असून नसल्यासारखीच असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही समिती बिनकामाची असल्याची चर्चा बाळ्ळी परिसरात सुरू आहे. एसजीपीडीएवरून आमदार राजन नाईक यांना मुक्त केले. आता या देखरेख समितीवरून अवदी यांनाही मुक्त करावे. ज्यामुळे या समितीच्या कामालाही चालना मिळू लागेल, असे आता बाळ्ळीकर म्हणू लागले आहेत.