कुजबूज
By admin | Published: January 30, 2016 2:12 AM
झेडपीच्या गाड्या
झेडपीच्या गाड्या दक्षिण गोवा जिल्हापंचायतीच्या गाड्या जुन्या झाल्याने त्या बदलून दुसर्या घेण्याचा ठराव सदस्यांनी मांडला; परंतु जिल्हापंचायतीजवळ निधी नसल्याने नवीन गाड्या घेणे परवडणारे नाही. यासाठी भाडेप?ीवर गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर बाणावलीच्या जिल्हापंचायत सदस्यांनी गाड्यांचे गमतीदार उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, जिल्हापंचायतीची गाडी बंद पडली, ती ढकलण्याचा प्रय} केला; परंतु गाडी मागेही जात नाही पुढेही जात नाही, हे ऐकताच सर्व जिल्हापंचायत सदस्यांना आपले हसू आवरता आले नाही.विकासकामाऐवजी कार्यक्रमावर चर्चा दक्षिण गोवा जिल्हापंचायतीच्या शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामावर चर्चा करण्याऐवजी कार्यक्रम आयोजन करण्यावर जास्त चर्चा केली. काहींनी फुटबॉल सामने आयोजित करण्याचा ठराव मांडला. काहींनी वैद्यकीय शिबिर आयोजित करण्याचा ठराव मांडला. शेवटी दक्षिण गोवा लेखापालांनी दक्षिण गोवा जिल्हापंचायतीजवळ निधी नसल्याने जिल्हापंचायतीमार्फत असे कार्यक्रम आयोजित करता येणार नसल्याचे सांगितल्यावर अनेकांचा हिरमोड झाला.