कुजबूज--28 ऑगस्ट सद्गुरू
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM
कसिनो मांडवीतच
कसिनो मांडवीतच.............कसिनो जहाजे मांडवी नदीतच कायम राहणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. ही जहाजे मांडवीच्या बाहेर जावीत असे पणजीतील काही व्यवसायिकांनाही वाटत नाही. काही टॅक्सी व्यवसायिकही कसिनो मांडवीतच रहावेत या मताचे आहेत. मात्र भाजपने निवडणूक जाहीरनाम्यातून आश्वासन दिले होते, की कसिनो जहाजे मांडवीतून बाहेर नेली जातील. यामुळे पार्सेकर सरकारची अडचण झाली आहे. सरकार कात्रीत सापडले आहे पण कसिनो मांडवीतच राहतील अशी स्पष्ट माहिती अनेक मंत्र्यांकडून ऑफ द रेकॉर्ड मिळते. शापोरा व परिसरातील लोक आपल्या भागात कसिनो जहाजे नकोच असे म्हणतात. शिवोलीचे आमदार असलेले मंत्री मांद्रेकर हेही शापोरामध्ये कसिनो नको म्हणतात. आग्वाद येथेही कसिनो ठेवण्यास विरोध होत आहे. यामुळे आम्ही ते मांडवीतच ठेवूया अशी सोयीची भूमिका सरकारने घेतली आहे.......अखेर आयुक्त निवडराज्यासाठी मुख्य माहिती आयुक्त आणि दोन राज्य माहिती आयुक्त निवडणे बराच काळ अडून उरले होते. सरकारच्या समितीने यापूर्वी चार बैठक घेतल्या. पाचवी बैठक शुक्रवारी झाली व अखेर मुख्य माहिती आयुक्त आणि दोन राज्य माहिती आयुक्तही निवडले आहेत. त्यांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत. आज शनिवारी बैठकीचे इतिवृत्त तयार होईल. लिना मेहेंदळे यांचा कालावधी संपल्यापासून म्हणजे गेल्या जानेवारीपासून मुख्य माहिती आयुक्तपद रिकामे आहे. तत्पूर्वीपासूनच दोन राज्य माहिती आयुक्तपदेही रिकामी आहेत. सरकारच्या यापूर्वीच्या निवडी वादग्रस्त ठरल्या होत्या. दोनवेळा त्या रद्दही कराव्या लागल्या. यावेळी मात्र वाद होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी घेतली आहे. माहिती आयोगाचे काम ठप्पच झालेले आहे. नव्या निवडीमुळे यापुढे तरी आयोग सक्रिय होईल.........