'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 02:42 AM2020-02-23T02:42:16+5:302020-02-23T02:42:34+5:30

काँग्रेस म्हणते ‘डिप्लोमसी’ म्हणजे शोबाजी नाही

'Who are the hosts of the event though?' | 'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?'

'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?'

Next

नवी दिल्ली/अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी येत्या सोमवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे नेमके यजमान कोण आहेत आणि यजमानपद सरकारकडे नसेल तर या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी गुजरात सरकार १२० कोटी रुपये का खर्च करीत आहे, असे प्रश्न काँग्रेसने शनिवारी उपस्थित केले.

ट्रम्प यांचा हा कार्यक्रम ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ तर्फे आयोजित करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी टष्ट्वीट केले: प्रिय पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली बातमी सहस्यमय आहे. तरी कृपया पुढील गोष्टींचा खुलासा करावा: १. डोनाल्ड ट्रम्प अभिनंदन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? २.(त्यांनी) ट्रम्प यांना निमंत्रण केव्हा दिले व ते त्यांनी केव्हा स्वीकारले? ३. त्या कार्यक्रमाला ७० लाख लोक उपस्थित राहतील अशी हमी तुम्ही दिली असल्याचे ट्रम्प का बरं सांगत आहेत?

आणखी एका टष्ट्वीटमध्ये सुरजेवाल यांनी असेही विचारले: ट्रम्प अभिनंदन समिती सरकारी नसेल तर त्या ३ तासांच्या कार्यक्रमासाठी गुजरात सरकार १२० कोटी का खर्च का करत आहे? दौºयावर येणाºया परदेशी पाहुण्याचा आदरसत्कार करणे ही भारताची परंपरा आहे. पण हेही लक्षात घ्या की, डिप्लोमसी ही सरकारने हाताळायची गंभीर बाब आहे व ती ‘फोटो आॅप’ व ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची संधी नाही.
दरम्यान, या अहमदाबादमध्ये या नागरिक अभिनंदन समितीची पहिली बैठक सरकारी गेस्ट हाऊसवर झाली. त्यात कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. अहमदाबादचे महापौर बिजल पटेल या १० सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत.त्यात अहमदाबादचे हसमुख पटेल व किरिट सोलंकी दोन्ही भाजपा खासदार, नामवंत आर्किटेक्ट पद्मभूषण बी. व्ही. दोशी, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु हिमांशु पंड्या व गुजरात चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इन्डस्ट्रीचे अध्यक्ष दुर्गेश बुच यांच्यासह इतर सदस्य आहेत.
सुरजेवाला यांनी केलेल्या टष्ट्वीटविषयी विचारता महापौर बिजल पटेल यांनी त्यातील आरोप तद्दन बिनबुडाचे असल्याचे सांगितले.

Web Title: 'Who are the hosts of the event though?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.