शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

कोण आहेत नवनीत कौर राणा?; शरद पवारांनी घेतली 'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 7:17 PM

'सत्तास्थापनेबाबत चर्चाच नाही'

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीत उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. 

या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नसल्याचे सांगितले. तसेच, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली. 

दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे विधान केले आहे. शरद पवारांनी देशाचे नेतृत्व केले आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे. 

(सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर')

याचबरोबर, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांनी सरकार स्थापन करायला हवे होते. शिवसेना-भाजपा महायुतीला कौल दिला आहे. मात्र राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. निम्म्या जागा असताना मुख्यमंत्रिपद मागणे चुकीचे आहे. त्यांच्या मुळेच राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, अशा शब्दात नवनीत कौर राणा यांनी शिवेनेवर हल्लाबोल केला.

आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेलबैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले. 

सभागृहाची प्रतिमा जपायला हवी राज्यसभेच्या महत्वाची बाब म्हणून संसदेत चर्चा झाली. सभागृहाची प्रतिमा जपण्यावर भाष्य झालं. त्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. मी इतकी वर्ष विधानसभा, राज्यसभा, लोकसभा पाहिली. पण विरोध करण्यासाठी मी कधी वेलमध्ये आलो नाही. सभागृहाची प्रतिमा जपायला हवी असं मत पवारांनी मांडलं.  

नवनीत राणा कौर यांना आघाडीचे समर्थनलोकसभेच्या अमरावती मतदारसंघाच्या निडणुकीत नवनीत राणा कौर यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समर्थन दिले होते. यासाठी नवनीत राणा कौर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या निवडणुकीत नवनीत राणा कौर यांनी युतीचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnavneet kaur ranaनवनीत कौर राणाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र