रामललाच्या पूजेसाठी पुजारी कोण आहेत, पाहा
मोहित पांडे
राम मंदिराच्या गर्भगृहातील रामलललाच्या पूजेसाठी पुजारी म्हणून गाझियाबादच्या सीतापूर येथील २२ वर्षीय मोहित पांडे यांची निवड केली आहे. रामलल्लांचा पूजेसाठी नेमलेल्या पुजाऱ्यांनी रामनंदीय परंपरेचा अभ्यासक असण्यासह वेद, शास्त्र आणि संस्कृतमध्ये निपुण असणे आवश्यक होते. मोहित पांडे यांनी बीए (ऑनर्स) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर तिरुमाला तिरुपती देवस्थानमद्वारे संचालित श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठात एमए (आचार्य) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सध्या ते सामवेद विभागात प्रथम वर्षाला शिकत आहे.
आचार्य सत्येंद्र दास
हित पांडे यांच्यासोबतच श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून ८३ वर्षीय आचार्य सत्येंद्र दास हेदेखील चर्चेत आहेत. संत होण्याच्या उद्देशाने ते घर सोडून १९५८ मध्ये अयोध्येत आले. गेल्या ३१ वर्षांपासून ते श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. १९९२ मध्ये वादग्रस्त बांधकाम पाडण्यापूर्वी सुमारे ९ महिने आचार्य सत्येंद्र दास येथे पुजारी म्हणून रामलल्लांची पूजा करत आहेत. १९९२ मध्ये त्यांना श्रीरामजन्मभूमी मंदिरात पूजा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले, तेव्हा त्यांना १०० रुपये पगार मिळत असे. आता त्यांचे वेतन ३२ हजार रुपये इतके आहे.