PM मोदींची जागा कोण घेऊ शकतं? काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:21 PM2024-04-03T13:21:40+5:302024-04-03T13:22:14+5:30
थरूर यांनी स्वतःच सांगितले की, त्यांना नुकताच एका पत्रकाराने नरेंद्र मोदींच्या 'पर्याया'संदर्भात प्रश्न विचारला होता.
खासदार शशी थरूर केरळच्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. या भागात त्यांचे दौरे सुरू आहेत. दरम्यान, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. खरे तर थरूर यांनी स्वतःच सांगितले की, त्यांना नुकताच एका पत्रकाराने नरेंद्र मोदींच्या 'पर्याया'संदर्भात प्रश्न विचारला होता. मात्र, असा प्रश्न आपल्याला पहिल्यांदाच विचारण्यात आला असे नाही. असेही थरूर यांनी म्हटले म्हटले आहे.
काय म्हणाले थरूर? -
काँग्रेस खासदार शषी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅट फॉर्म एक्सवर म्हटले आहे की, 'एका पत्रकाराने पुन्हा एकदा मोदींचा पर्याय कोण? असा प्रश्न केला आहे.'
थरूर पुढे म्हणाले, 'संसदीय व्यवस्थेत हा प्रश्न अप्रासंगिक आहे. आपण कुण्या एकाची निवड करत नाही. तर, पक्ष अथवा पक्षांच्या आघाडीची निवड करत आहोत, जे सिद्धांत आणि संकल्प दाखवतात, जे भारताच्या विविधतेचे संरक्षण करण्यात आणि सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.'
तसेच, 'मोदींचा पर्याय अनुभवी आणि सक्षम भारतीय नेत्यांचा आहे. जो लोकांच्या समस्यांना प्रतिसाद देतील आणि अहंकाराने वागणार नाहीत. ते पंतप्रधान म्हणून कुणाची निवड करतात ही दुसरी गोष्ट आहे. आपली लोकशाही आणि विविधतेचा बचाव करणे सर्वात पहिले कर्तव्य आहे,' असेही थरूर म्हणाले.