नवी दिल्ली : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे देशाचे सैन्य. लष्कर, वायुसेना आणि नाैदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे. तर, राजकीय पक्षांवर नागरीक सर्वात कमी विश्वपस ठेवतात. याशिवाय पंतप्रधान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सर्वाेच्च न्यायालयावरही देशातील जनता खूप विश्वास ठेवते. ‘इप्साेस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे.
सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विराेधकांनी अनेक प्रकारचे आराेप केले. तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सर्वक्षणातून आणखी एक राेचक बाब समाेर आली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते तसेच राजकीय पक्षांपेक्षा पाेलिसांवर जास्त विश्वास आहे. याशिवाय जनतेने प्रसार माध्यमांवरही विश्वास असल्याचे सांगितले आहे.
देशभरातील महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरातील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात विविध उत्पन्न गट, वयाेगट आणि वर्गातील लाेकांचा त्यात समावेश हाेता.
राजकीय पक्ष - ३०
राजकारणी - ३१
धर्मगुरू - ३३
समाज नेते - ३४
स्वयंसेवी संस्था - ३४
पाेलिस - ३५
प्रसार माध्यमे - ३६
सैन्य - ५४
पंतप्रधान - ४९
आरबीआय - ४८
सुप्रीम कोर्ट - ४५
सीबीआय - ४३
निवडणूक आयाेग - ४१
संसद - ३७