बंगळुरू : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात टीपू सुल्तानवरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. टीपू सुल्तानची हत्या ब्रिटीश आणि मराठा सैन्याने नव्हे तर वाेक्कलिगा समाजाच्या नेत्यांनी केली हाेती, असा दावा भाजपने केला आहे.
टीपू सुल्तानने म्हैसूरवर १८व्या शतकात राज्य केले हाेते. सत्ताधारी भाजपने टीपू सुल्तानला निवडणुकीचा मुद्दा बनविले आहे. जुन्या म्हैसूरमध्ये अजूनही हा दावा केला जाताे की, उरी गाैडा आणि नांजे गाैडा या दाेन वाेक्कलिगा प्रमुखांनी त्याची हत्या केली हाेती. म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता.
लेखक निर्देशक अडांडा सी करयप्पा यांनी हे नाटक लिहिले हाेते. मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी मात्र स्वत:ला या वादापासून दूर ठेवले आहे. संशाेधनातून खरी माहिती उघड हाेईल, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)