शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

महाराष्ट्रातून कोण-कोण? भाजपची शुक्रवारी बैठक; २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 6:27 AM

केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे जिथे ते युती करण्यात सक्षम आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधील उर्वरित जागा देखील घोषित केल्या जाऊ शकतात.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची येथे ८ मार्च रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत भाजपने १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

केंद्रीय निवडणूक समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल आणि इतर काही राज्यांवर भाजप लक्ष केंद्रित करणार आहे जिथे ते युती करण्यात सक्षम आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधील उर्वरित जागा देखील घोषित केल्या जाऊ शकतात. कारण, त्या राज्यांतील राज्य शाखेने त्यांच्या शिफारसी पक्षाकडे पाठविल्या आहेत. पंजाब आणि हरयाणामधील निवडणुका साधारणपणे टप्प्याटप्प्याने नंतरच्या फेऱ्यांमध्ये होत असल्याने यास थोडा वेळ लागू शकतो. अकाली दलासोबत भाजपची चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन यातील अडथळा ठरत आहे. 

आतापर्यंत काय झाले?मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग, रमेश पोखरियाल निशंक, डी. व्ही. सदानंद गौडा, डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, संतोष कुमार गंगवार, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रताप चंद्र सारंगी किंवा देबश्री चौधरी या नेत्यांना वा माजी मंत्र्यांना २०१९ नंतर संधी मिळाली नाही. केवळ थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल झाले. शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला.

‘नको त्या व्हिडीओ’मुळे लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णयबाराबंकी : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी निर्दोष असल्याचे सिद्ध होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे उत्तर प्रदेशमधील ‘भाजप’चे खासदार उपेंद्रसिंह रावत यांनी सांगितले. ‘भाजप’ने पहिल्या यादीत रावत यांना बाराबंकी मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

१९५ उमेदवारांच्या यादीत चार केंद्रीय मंत्र्यांसह ३४ विद्यमान खासदारांना वगळण्यात आले.आणखी५०ते६० खासदार तिकीट गमावण्याची दाट शक्यता आहे.- बीजेडीने ४२.८ टक्के मते मिळवून लोकसभेच्या १२ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या आणि ३८.४ टक्के मते मिळविली होती. तर काँग्रेसने एक जागा जिंकत १३.४ टक्के मते घेतली होती.

ओडिशामध्ये भाजपची नवी खेळीओडिशामध्ये मे २०२४ मध्ये एकाच वेळी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि बिजू जनता दलाच्या नेतृत्वाकडून युतीसाठी शेवटचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात हे दोन्ही पक्ष अनेक दशकांपासून एकमेकांविरुद्ध लढत आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. ओडिशातून अश्विनी वैष्णव यांच्यासाठी राज्यसभेची जागा मागितली तेव्हा पटनायक यांनी पंतप्रधानांना त्यासाठी होकार दिला. दोन्ही नेत्यांची नुकतीच पुन्हा भेट झाली तेव्हा औपचारिक युती किंवा जागेच्या तडजोडीचा मुद्दा गाजला.

गुजरातमध्ये काँग्रेसला २ धक्केअहमदाबाद : गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अंबरीश डेर यांनी सोमवारी पक्षाचा राजीनामा दिला. ते मंगळवारी सत्तारूढ भाजपमध्ये दाखल होणार आहेत. काँग्रेसचे गुजरातमधील माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElectionनिवडणूकBJPभाजपा