मुंबई : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आमदार एकूण मतदानाच्या सरासरी ५० टक्के मतांनी विजयी झाले. २०१८ मध्ये हेच प्रमाण ४८ टक्के इतके होते. तसेच नोटाला झालेले मतदान २,६९,७६३ (०.६९%) आहे.
एडीआर अहवालानुसार, ११३ (५०.४५%) आमदारांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. याचवेळी १११ (४९.५०%) आमदारांना सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी मते मिळाली आहेत. फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या १२३ पैकी ६३ आमदारांनी (५१%) ५० टक्केपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. तर २१८ कोट्यधीश आमदारांपैकी १११ (५१%) आमदारांना ५० टक्केपेक्षा अधिक मते खेचण्यात यश आले आहे.
महिला आमदारांचे काय? २२४ पैकी १० महिला आमदार आहेत. सर्व महिला आमदारांनी ३५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मते घेत विजय मिळवला. भाजपच्या आमदार भागीरथी मुरुळ्या यांनी सर्वाधिक मते (५७.०१%) मिळवत विजय मिळविला.
कुणी कुणाचा केला पराभव? गुन्हे दाखल असलेल्या १२३ पैकी ६३ आमदारांनी स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराचा पराभव केला. यातील ६३ पैकी ३५ आमदारांनी १० टक्केपेक्षा अंतराने मते मिळवत विजय मिळवला. यातील चारमाजपेट विधानक्षेत्रातील काँग्रेसचे आमदार बी. जेड. जमीर अहमद खान यांनी ४३ टक्केपेक्षा अधिक अंतर राखून विजय मिळविला.
८ आमदारांनी १०००पेक्षा कमी मतांनी विजय ५ आमदारांनी ४०%पेक्षा अंतराने विजयकरोडपती आमदारांचे काय? २१८ पैकी ७ करोडपती आमदारांनी कोट्यधीश नसलेल्या उमेदवाराला अस्मान दाखवले.
७ पैकी २ आमदारांनी ३०% पेक्षा अधिक अंतर राखून विजय मिळविला. यातील भाजपचे भालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी यांनी ३८ टक्क्यांचे अंतर राखून विजय मिळविला.
सर्वाधिक मतांनी कोण जिंकले?७५% डीके शिवकुमार काँग्रेस - १४३०२३
७०% गणेश प्रकाश हुक्केरी काँग्रेस - १२८३४९ ६८% लक्ष्मण सवदी काँग्रेस - १३१४०४
अटीतटीच्या लढतीत कोण जिंकले?
आमदार पक्ष किती मतांनी विजयसी. के. रामामूर्ती भाजप १६ दिनेश गुंडू राव काँग्रेस १०५टी.डी. राजेगौडा काँग्रेस २०१केवाय नांजेगौडा काँग्रेस २४८दिनकर शेट्टी भाजप ६७६नयना मोत्तमा काँग्रेस ७२२अविनाश जाधव भाजप ८५८बी. देवेंद्रप्पा काँग्रेस ८७४
गुन्हे असलेले आमदार किती मतांनी जिंकले? मते %५० टक्केपेक्षा अधिक ६० ४९% ५० टक्केपेक्षा कमी ६३ ५१% करोडपती आमदारांचे काय? ५० टक्केपेक्षा अधिक १०७ ४९% ५०टक्केपेक्षा कमी १११ ५१%