- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले.ते म्हणाले की, आता प्रकाशित झाला आहे, तो एनआरसीचा अंतिम मसुदा आहे. तो अंतिम एनआरसी नाही, हे लक्षात ठेवावे. या मसुद्यात२४ मार्च १९७१ पूर्वीपासून आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेशआहे. पण काहींनी पुरावे सादर करूनही त्यांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अवधी देण्यात आलेला आहे.आतापर्यंत ज्यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट, विमा पॉलिसी आहेत, त्यांच्या समावेश केला आहे.तसेच भारतात १९७१ वा त्याआधीपासून राहणारे व आसाममध्ये मधील काळात स्थायिक झालेले जे लोक आहेत, त्यांनी आपल्या मूळ राज्यातील वास्तव्याचे अधिकृत पुरावे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.स्व. राजीव गांधी पंतप्रधान असताना जो आसाम करार झाला, त्यानुसार हे काम सुरू झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एनआरसी अद्ययावत करण्याचा निर्णय झाला होता, याची आठवण करून देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे सारे काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाले आहे आणि होणार आहे. त्यामुळे जे या देशाचे नागरिक आहेत व तसा पुरावा देतील, त्यांची नावे त्यात नोंदवली जातील.तृणमूलच्या लोकप्रतिनिधींवर टीकातृणमूल काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे सिल्चर विमानतळावरील वागणे अतिशय वाईट व नियमांना धरून नव्हते, अशी टीका गृहमंत्र्यांनी लोकसभेत केली. ते म्हणाले की, त्यांच्या आसामात जाण्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असा अहवाल गुप्तचरांनी दिल्यामुळे त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि विमानतळाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला, असे ते म्हणाले.हक्कभंग प्रस्ताव आणणारतृणमूलचे जे खासदार व आमदार आसामात जाण्यासाठी सिल्चर विमानतळावर पोहोचले होते, ते रात्रभर तिथे थांबून आज पुन्हा कोलकात्याला पोहोचले. आम्हाला आसाम पोलिसांनी विमानतळावर धक्काबुक्की केली, असा आरोप त्यांनी कोलकात्यात केला.हा प्रकार म्हणजे खासदार व आमदारांच्या विशेषाधिकाराचेउल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत, असे तृणमूल काँग्रेसने जाहीर केले.ज्यांची नावे या नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्यात नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आणखीही मुदत देण्यात येणार आहे. या निमित्ताने काही जण मुद्दाद वातावरण बिघडवून पाहत आहेत.- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री
एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 5:03 AM