'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध; कोण आहेत झारखंडचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री चंपई सोरेन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 09:55 PM2024-01-31T21:55:22+5:302024-01-31T22:03:11+5:30

हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेने यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

Who is Champai Soren: Known as 'Jharkhand Tiger'; Who is the new Chief Minister of Jharkhand Champai Soren? | 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध; कोण आहेत झारखंडचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री चंपई सोरेन?

'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध; कोण आहेत झारखंडचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री चंपई सोरेन?

Who is Champai Soren (Marathi News) :झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ED चौकशी सुरू असलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, JMM आमदारांनी चंपई सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. 'झारखंड टायगर' म्हणून प्रसिद्ध असलेले चंपई सोरेन आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले. आज दुपारपासून ईडीने सोरेन यांची चौकशी केली. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चंपई सोरेन यांना झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली आहे. 

कोण आहे चंपाई सोरेन?
चंपई सोरेन हे सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असून ते शेती करायचे. चार मुलांमध्ये चंपई सर्वात मोठे आहेत. चंपई यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे लहान वयातच माणको यांच्याशी लग्न झाले. चंपई यांना 4 मुलगे आणि तीन मुली आहेत.

याच काळात बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपईदेखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. या काळात ते 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर चंपई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

भाजप सरकारमध्ये मंत्रीही राहिले 
भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षे 129 दिवसांच्या सरकारमध्ये JMM नेते चंपई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. चंपाई 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पुढे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले.

हेमंत सोरेन सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री 
हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर चंपई यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झामुमोचे उपाध्यक्षही आहेत. आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. म्हणजेच ते चंझारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील.

Web Title: Who is Champai Soren: Known as 'Jharkhand Tiger'; Who is the new Chief Minister of Jharkhand Champai Soren?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.