कोण आहेत CJM वर्मा, ज्यांनी राहुल गांधींना सुनावली २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:14 PM2023-03-23T19:14:02+5:302023-03-23T19:14:46+5:30

जाणून घ्या मोदी अडनाव मानहानी प्रकरणात निकाल देणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्याबद्दल...

Who is cjm hh verma who sentenced rahul gandhi two years jail in modi surname defamation case | कोण आहेत CJM वर्मा, ज्यांनी राहुल गांधींना सुनावली २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

कोण आहेत CJM वर्मा, ज्यांनी राहुल गांधींना सुनावली २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

googlenewsNext

Rahul Gandhi Modi Surname Case, CJM HH Verma: मोदी आडनाव बदनामी प्रकरणात कोणतीही दया न दाखवता सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासासह 15,000 रुपयांचा दंड ठोठावला. राहुल गांधी सुरत येथील 8 लाइन्स येथील जिल्हा व सत्र न्यायालयात CJM एचएच वर्मा यांच्या न्यायालयात हजर झाले. तिथे त्यांना प्रथम दोषी ठरवण्यात आले, त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती एचएच वर्मा (CJM HH Verma) यांनी राहुल गांधींना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 500 अंतर्गत दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंड ठोठावला. मानहानीच्या या हायप्रोफाईल प्रकरणात राहुल गांधींना शिक्षा सुनावणारे मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा नक्की कोण आहेत, जाणून घेऊया.

वडोदरा येथून शिक्षण

एचएच वर्मा यांचे पूर्ण नाव हरीश हसमुखभाई वर्मा आहे. सुरतच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सीजेएम म्हणून कार्यरत असलेले एचएच वर्मा मूळचे हिंदी भाषिक प्रदेशातील आहेत, पण त्यांचा जन्म वडोदरा, गुजरात येथे झाला आणि त्यांनी वडोदराच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून (एमएस विद्यापीठ) शिक्षण घेतले. एमएसयूमधून एलएलबी पदवी पूर्ण केल्यानंतर एसएच वर्मा न्यायिक अधिकारी बनले. ते जवळपास दोन वर्षांपासून सुरत कोर्टात CJM म्हणून कार्यरत आहेत. वर्मा यांचे वडील हसमुख वर्मा हे पेशाने वकील आहेत. वडील वकील असल्यामुळे वर्मा यांचा न्यायालयीन सेवेकडे कल होता आणि ते २००८ मध्ये या सेवेत रुजू झाले. वर्मा काही दिवसांत कॅडर पदोन्नतीनंतर ADJ म्हणून न्यायिक सेवा देतील.

शिस्तबद्ध न्यायाधीश अशी प्रतिमा

CJM HH वर्मा, जे राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यामुळे प्रसिद्धीझोतात आले, त्यांची प्रतिमा कठोर आणि शिस्तप्रिय न्यायाधीश अशी आहे. वर्मा हे ४३ वर्षांचे असून वक्तशीर आहेत. ते नियमपुस्तिकेनुसार न्यायनिवाडा करतात. सुरतमध्ये अनेक प्रसंगी, न्यायालयात वकील नसतानाही त्यांनी पीडित पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर जिल्हा विधी कक्षाची मदत घेण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले. वर्मा यांच्या न्यायालयात वारंवार हजर राहणारे वरिष्ठ वकील म्हणतात की, जर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सूट घ्यायची असेल, तर तुम्हाला 11 वाजेपूर्वी अर्ज करावा लागेल. अन्यथा ते ऑर्डर पास करतात. गुजरात उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर एचएच वर्मा यांनी मोदी आडनाव प्रकरणातील सुनावणी अतिशय वेगाने पूर्ण केली आणि या खटल्याचा निकाल दिला.

Web Title: Who is cjm hh verma who sentenced rahul gandhi two years jail in modi surname defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.