नवी दिल्ली - सध्या देशात राहुल गांधी यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. याच राहुल गांधींच्या लग्नाबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे. राहुल गांधी यांचे वय ५२ वर्ष झाले आहे. तरीही देशातील युवा नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. परंतु सध्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्याच्या जाहिरातीमुळे राहुल गांधी चांगलेच चर्चेत आले आहेत.
तामिळनाडूच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींचा हसता चेहरा आणि त्याचसोबत वेडिंग रिसेप्शन इन्विटेशन असं कॅप्शन पाहून सगळेच अवाक् झाले. ही जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात ४ पानी छापण्यात आली आहे. ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल. वृत्तपत्राचे पान पलटले तर दुसऱ्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा चेहरा दिसतो. त्यानंतर तिसऱ्या पानावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी त्यानंतर पुढील पानांवर प्रियंका गांधी आणि शेवटी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांना स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेस नेत्याने दिली मेजवानी तामिळनाडू काँग्रेसचे नेते केएस अलागिरी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनची मेजवानी दिली आहे. यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात चार पानी जाहिरात दिली आहे. मात्र, वृत्तपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण राज्यातील जनतेला निमंत्रित करण्यात आले आहे की केवळ चार पानांमध्ये दाखवलेल्या नेत्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे हे स्पष्ट नाही.
मात्र वृत्तपत्राची जाहिरात पाहून सुरुवातीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच लग्न केले आहे आणि ते रिसेप्शनसाठी आमंत्रित करत आहेत असं वाटतं. आता तुम्ही विचाराल की, स्वतः जाहिरातीत मुलगी कांचनच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमंत्रित केलेले केएस अलागिरी कुठे आहेत? त्यामुळे तुम्ही राहुल गांधींच्या फोटोखाली त्यांचा फोटो पाहू शकता.
गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनाही संसदेतून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर त्यांना घर रिकामे करण्याची नोटीसही मिळाली. ते दोन दिवसांपूर्वी 'बेघर' झाले आहेत. वर्तमानपत्रातील जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होणार हे नक्की. सोशल मीडिया ट्रोलिंग करण्यात माहीर असलेल्यांनी राहुल गांधी बेघर होऊन सेटल व्हायला गेले आहेत का? असा सवालही केला आहे.