शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोण आहेत पल्लवी पटेल? ज्यांनी भाजपच्या झंझावातातही केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:37 IST

Pallavi Patel : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला.

लखनऊ : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांना सिरथू विधानसभेच्या जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीच्या (SP) उमेदवार पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी 7,337 मतांनी पराभव केला.

सपा उमेदवार पल्लवी पटेल यांना 1,06,278 मते मिळाली तर केशव प्रसाद मौर्य यांना 98,941 मते मिळाली. पल्लवी पटेल या समाजवादी पार्टीचा सहयोगी पक्ष अपना दलच्या (कमेरावादी) राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. सुरुवातीपासूनच पल्लवी पटेल यांनी केशव प्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी घेतली आणि शेवटी विजय मिळवला. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयाच्यावेळी केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते.

पराभवानंतर केशव प्रसाद मौर्य म्हणाले...निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मी जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारतो. केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट केले की, "सिराथू विधानसभा मतदारसंघातील जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीबद्दल मी कृतज्ञ आहे, ज्या मतदारांनी मतांच्या रूपात आशीर्वाद दिला त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो."

कोण आहेत पल्लवी पटेल?पल्लवी पटेल या अपना दल (सोनेलाल) पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांच्या बहीण आहेत. पल्लवी पटेल आणि अनुप्रिया पटेल यांचे वडील सोनेलाल पटेल यांनी अपना दल स्थापन केला होता. त्यानंतर 2009 मध्ये सोनेलाल पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कृष्णा पटेल यांनी पक्षाची धुरा सांभाळली. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपना दलाने भाजपसोबत युती केली आणि अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून खासदार झाल्या. मात्र, नंतर त्यांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यानंतर अनुप्रिया पटेल आणि त्यांचे पती आशिष सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये अनुप्रिया पटेल यांनी आपला दल (सोनेलाल) स्थापन केला. तर अपना दलची (कमेरावादी)  कमान पल्लवी पटेल आणि त्यांची आई कृष्णा पटेल यांच्याकडे आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी