नवी दिल्ली - एखाद्या पक्षाला देणगी द्यायची असेल तर इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून ती देता येते. बँकेत या बॉण्ड्सची माहिती मिळते. गेल्या चार वर्षांत सर्व राजकीय पक्षांना या इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून ९ हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.
राजकीय पक्षांना देणग्या मिळतात कशा?थेट लोकांकडूनप्रतिष्ठित उद्योजकांकडूनविदेशी कंपन्यांकडून
इलेक्टोरल बॉण्ड म्हणजे?
हे बॉण्ड्स बेअरर चेकसारखे असतात. त्यावर बॉण्ड खरेदी करणाऱ्याचे वा ज्या पक्षाला देणगी दिली जाणार आहे त्या पक्षाचे दोघांचेही नाव नसते. जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये १० दिवस हे बॉण्ड्स खरेदीसाठी उपलब्ध असतात. भारतीय स्टेट बँकेच्या २९ शाखांमधून हे बॉण्ड्स घेता येऊ शकतात.लोकसभा निवडणूक असेल त्या वर्षी ३० दिवसांपर्यंत हे बॉण्ड्स मिळवता येऊ शकतात.कोणत्याही भारतीय नागरिकाला हे इलेक्टोरल बॉण्ड्स घेता येतात. १ हजार, १० हजार, १ लाख, १० लाख आणि १ कोटी रुपयांपर्यंतचे हे बॉण्ड्स असतात. नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच ज्यांना विधानसभा निवडणुकीत किमान १ टक्का मते मिळाली आहेत, अशांना हे बॉण्ड्स घेता येतात.
२०१९-२० मध्ये मिळालेल्या देणग्या
इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून मिळालेली रक्कम (आकडे काेटी रूपये)
भाजपा - १४५०
काँग्रेस - ३८३
बिजू जनता दल - २१३
तेलंगण राष्ट्र समिती - १४१
वायएसआर काँग्रेस - ९९
एकूण मिळालेल्या देणग्या
भाजप - २३५४
काँग्रेस - ५५
बिजू जनता दल -२४
तेलंगण राष्ट्र समिती - १८२
वायएसआर काँग्रेस- १८१