शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

कोण आहेत म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 4:21 PM

Who Is Pratap Simha? ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक)  भाजप खासदार आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संसदेच्या सुरक्षेच्या दाव्यांचा धुरळा उडवत लोकसभेच्या व्हिजिटर गॅलरीतून दोन तरुणांनी खाली उडी मारली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी कर्नाटकचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या संदर्भाने बनवलेल्या व्हिजिटर पासद्वारे संसदेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. 

संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असे आहे. त्याच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. म्हणजे एकूण चार जण होते. ज्यांची चौकशी सुरू आहे. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, ते दोघेही म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने लोकसभा व्हिजिटर पासवर आले होते. तर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, शून्य प्रहरात दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि त्यांनी काहीतरी फेकले, त्याद्वारे गॅस बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

अशा परिस्थितीत खासदार प्रताप सिम्हा यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया. ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक)  भाजप खासदार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव बी.ई. हे गोपाळ गौडा आहे. त्यांची मतदार म्हणून ओळख २१५-चामुंडेश्वरी (कर्नाटक) मतदारसंघातील आहे. ते कन्नड भाषेतील वृत्तपत्रांत कॉलम (स्तंभलेखन) लिहितात. प्रताप सिम्हा पेशाने पत्रकार आहेत. तसेच, ते आपल्या हिंदुत्वाच्या राजकारणासाठी ओळखले जात असून भारतीय जनता पार्टी (भाजपा) कर्नाटकच्या युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत.

प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेल्या सकलेशपूर येथे झाला. कर्नाटकातून प्रकाशित होणाऱ्या विजया कर्नाटक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'बेट्टाले जगत्तु' या कॉलममुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. पुढे २००८ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हादी' (Narendra Modi: The Untrodden Road) नावाचे चरित्र लिहिले होते.

२०१४ मध्ये राजकारणात प्रवेशप्रताप सिम्हा यांनी २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर कमी कालावधीत ते भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. त्यांनी २०१४ मध्ये म्हैसूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ३२००० मतांच्या फरकाने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला होता. याचबरोबर, ते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यही आहेत.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाMember of parliamentखासदारBJPभाजपा