I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:11 IST2025-01-29T17:10:37+5:302025-01-29T17:11:23+5:30
महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं
तृनमूल काँग्रेसच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर थेट टीका केली आहे. गेल्या लोकसभान निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचला, यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच I.N.D.I.A.ला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय सत्तेत जाण्याची संधी मिळाली, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात तीन नवी पुस्तके लॉन्च केली. या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे नाव 'Banglar Nirbachon o Amra', असे आहे. या पुस्तकात त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाला संदर्भात आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.
"काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. पण..." -
आपल्या पुस्तकात ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे की, “सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीपासूनच एक समान किमान कार्यक्रम आणि समान जाहीरनाम्यासाठी आग्रही होतो. विरोधी आघाडीचे नावही माझाच प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. परंतु असे असतानाही, ना किमान समान कार्यक्रम होता, ना समान जाहीरनामा होता. आघाडीतील सदस्य आपापसात निवडणूक शर्यत करत होते. याचा फायदा भाजपला झाला आणि बहुमत नसतानाही ते सत्तेत परतण्यात यशस्वी झाले...