शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
5
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
6
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
7
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
8
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
9
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
11
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
12
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
13
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
14
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
15
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
16
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
18
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
19
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

I.N.D.I.A.च्या पराभवासाठी कोण जबाबदार? भाजपचा विजय कसा झाला? ममता बॅनर्जींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:11 IST

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

तृनमूल काँग्रेसच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर थेट टीका केली आहे. गेल्या लोकसभान निवडणुकीत भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचला, यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच I.N.D.I.A.ला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय सत्तेत जाण्याची संधी मिळाली, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात तीन नवी पुस्तके लॉन्च केली. या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे नाव 'Banglar Nirbachon o Amra', असे आहे. या पुस्तकात त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाला संदर्भात आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.

"काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. पण..." -आपल्या पुस्तकात ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे की, “सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीपासूनच एक समान किमान कार्यक्रम आणि समान जाहीरनाम्यासाठी आग्रही होतो. विरोधी आघाडीचे नावही माझाच प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीच्या नेत्याचे पद देण्यात आले. परंतु असे असतानाही, ना किमान समान कार्यक्रम होता, ना समान जाहीरनामा होता. आघाडीतील सदस्य आपापसात निवडणूक शर्यत करत होते. याचा फायदा भाजपला झाला आणि बहुमत नसतानाही ते सत्तेत परतण्यात यशस्वी झाले...

महत्वाचे म्हणजे, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, त्या आघाडीतील इतर सहकाऱ्यांच्या समर्थनामुळे जिंकल्या आहेत, असा दावाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा