शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 1:14 PM

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करणाऱ्या न्यायाधीशांविषयी जाणून घ्या...

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुईंया यांच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीनासोबत अनेक अटीही घालण्यात आल्या होत्या. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला कायदेशीर मान्यता दिली, पण सीबीआयच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान,  अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करणाऱ्या न्यायाधीशांविषयी जाणून घ्या...

कोण आहेत न्यायाधीश सूर्यकांत?१० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे जन्मलेल्या न्यायाधीश सूर्यकांत यांनी सरकारी कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महर्षि दयानंद विद्यापीठातून १९८४ मध्ये कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर कुरुक्षेत्र मुक्त विद्यापीठातून कायद्यात मास्टर्सही केले. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर न्यायाधीश सूर्यकांत यांनी १९८४ साली हिस्सारच्या जिल्हा न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली. १९८५ मध्ये ते चंदिगडला आले आणि पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात प्रॅक्टिस करू लागले.

हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता बनलेन्यायाधीश सूर्यकांत यांची ७ जुलै २००० रोजी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महाधिवक्ता बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती होते. न्यायाधीश सूर्यकांत यांची २००४ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर २०१८ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात सूर्यकांत यांच्या नियुक्तीची शिफारस केली आणि केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली.

पुढच्या वर्षी सरन्यायाधीश होतीलन्यायाधीश सूर्यकांत हे सुद्धा भारताचे सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर आहेत. सेवाज्येष्ठतेचे तत्त्व पाळल्यास ते २४ डिसेंबर २०२५ रोजी भारताचे सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ १.२ वर्षांचा असेल आणि ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर राहतील.

कोण आहेत न्यायाधीश उज्ज्वल भुईंया?अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे दुसरे न्यायाधीश उज्ज्वल भुईंया यांच्याबद्दल जाणून घ्या... आसाममधील गुवाहाटी येथे २ ऑगस्ट १९६४ रोजी  जन्मलेल्या उज्ज्वल भुईंया यांनी आपले शालेय शिक्षण गुवाहाटीमध्येच घेतले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते गुवाहाटीला परतले आणि सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी मिळवली. न्यायाधीश उज्ज्वल भुईंया यांनी १९९१ मध्ये वकील म्हणून सराव सुरू केला. गुवाहाटी उच्च न्यायालयात दीर्घकाळ प्रॅक्टिस केली. कर आकारणीशी संबंधित अनेक खटले जिंकले. गुवाहाटी उच्च न्यायालयाने त्यांची ६ सप्टेंबर २०१० रोजी ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती केली. यानंतर, २१ जुलै २०११ रोजी त्यांची आसामचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.

न्यायाधीश कधी आणि कसे बनले?न्यायाधीश उज्ज्वल भुईंया यांची १७ ऑक्टोबर २०१० रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर २० मार्च २०१३ रोजी त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनवण्यात आले. या काळात ते मिझोराम राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षही होते. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली. नंतर त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली आणि ते सर्वोच्च न्यायालयात आले.

कर आकारणी कायद्यातील तज्ज्ञ...न्यायमूर्ती उज्ज्वल भुईंया हे करविषयक कायद्यांचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या शिफारशीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने विशेषत: कर आकारणी कायद्यातील त्यांच्या कौशल्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या नियुक्तीमध्ये ते महत्त्वाचे मानले. न्यायाधीश उज्ज्वल भुईंया यांना गाणी, संगीत आणि अभिनयाची आवड आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCourtन्यायालय