अहमदाबाद : गेल्या ३० ऑक्टोबर रोजी गुजरातमधील मोरबी येथे माछू नदीवरील केबल पुल कोसळून त्यात १३५पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा पूल कोसळण्याच्या घटनेतील प्रमुख आरोपी कोण हे तपास यंत्रणा अद्याप निश्चित करू शकलेल्या नाहीत. तसेच या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना योग्य आर्थिक मदत मिळत नसल्याबद्दल गुजरात उच्च न्यायालयाने तेथील राज्य सरकारला नुकतेच फटकारले आहे. वारसदारांना प्रत्येकी सहा नव्हे दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
फोरेन्सिक अहवालाचा पत्ता नाहीमोरबी पुलाच्या कोसळलेल्या भागांची पोलिसांच्या फोरेन्सिक विभागाने पाहणी केली आहे. हा अहवाल मिळालेला नाही. ताे मिळाल्यावर आम्ही पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.