भारतात एकूण 17 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. यांतील काही ठिकाणी भाजप सत्ताधारी आघाडीत सहभागी आहे. तर 12 राज्यांमध्ये खुद्द भाजचपचेच मुख्यमंत्री आहेत. पण प्रश्न असा, की यांपैकी पंतप्रधना नरेंद्र मोदींचा फेव्हरिट मुख्यमंत्री कोण? सध्या, सर्वच राजकीय पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. यातच कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशसारखी काही राज्ये विधानसभा निवडणुकीलाही सामोरे जाणार आहेत.
योगी आदित्यनाथ आहेत पंतप्रधान मोदींचे फेव्हरिट CM? -इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवडते मुख्यमंत्री असल्याचे भाजप नेत्यांना वाटते. याचे श्रेय ते तेथील शासनाच्या रेकॉर्डला देतात. भाजपने 2022 मध्येही उत्तर प्रदेशात सीएम आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. मात्र, पंतप्रधानांच्या गुड लिस्टमध्ये सामील असलेल्या मुख्यमंत्र्यांची नावे येथेच संपत नाहीत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरही पंतप्रधान मोदी खुश आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान मोदी यांनी या तिन्ही मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीसंदर्भात कौतुकही केले आहे.
महत्वाचे म्हणजे, हे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीनंतर, त्यांच्याकडून मिळालेल्या निर्देशांसंदर्भात तत्काळ नौकरशाहांना माहिती देतात. एवढेच नाही, तर या निर्देशांसंदर्भात 15 दिवसात अहवालही मागवतात, असेही या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हणण्यात आले आहे.