शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Cough Syrup : भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित, WHO चा दावा; त्वरित कारवाईची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 09:12 IST

मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या  गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैद्यकीय इशारा जारी करून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात तयार केलेल्या कफ सिरपला दूषित म्हटले आहे. मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

या वैद्यकीय अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे सांगितले नाही. परंतु, डब्ल्यूएचओचे असे म्हणणे आहे की, ग्वायफेनेसिन सिरप टीजी सिरपसोबत डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे घटक आढळले आहेत. त्याच्या वापरामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे रसायन ऑस्ट्रेलियन नियामकाने ओळखले होते. 6 एप्रिल रोजी ही माहिती डब्ल्यूएचओला देण्यात आली.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या या इशाऱ्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की डब्लूएचओचा ई-मेल मिळाल्यानंतर हरयाणा आणि पंजाब सरकारला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. 

पंजाब आणि हरयाणातील कंपन्यांचे नाव समोरडब्ल्यूएचओने माहिती दिली आहे की, पंजाबची क्यूपी फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरयाणा इथल्या ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. डब्ल्यूएचओने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरु नये, असे आवाहन केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी कप सिरपच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत कोणतीही हमी दिलेली नाही, असे डब्लूएचओचे म्हणणे आहे.

याआधी भारतनिर्मित औषधांवर प्रश्नभारतात बनवलेल्या औषधांना अलर्ट मिळाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी सोनीपथमधील मैदान फार्मा कंपनीने तयार केलेल्या सर्दी खोकल्याच्या औषधामुळे गॅम्बियामधील 66 पेक्षा जास्त मुलांच्या मृत्यू झाल्याचा आरोप डब्ल्यूएचओने जारी केलेल्या अलर्टमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये, नोएडामधील मेरियन बायोटेकने बनवलेल्या कफ सिरपचे सेवन केल्यामुळे 18 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला होता. तर या महिन्यातच म्हणजे एप्रिल 2023 मध्ये, USFDA ने चेन्नईमधील ग्लोबल फार्मानिर्मित डोळ्यांच्या औषधामुळे यूएसमधील तीन जणांचा मृत्यू झाला तसेच अंधत्त्व आल्याचा दावा केला होता. तर आता मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये आढळलेले एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.  

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य