नवी दिल्ली : मंगळवारी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी देशातील जनतेला, देशाच्या प्रशासकीय तंत्राला आणि निवडणूक आयोगाला हास्यास्पद एक्झिट पोलच्या निष्कर्षांनी प्रभावित करण्याचा चुकीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आज आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी केला. शास्त्रशुद्ध एक्झिट पोलसाठी लागणारा पैसा कोणी दिला, असा सवालही विरोधकांनी केला आहे.
विश्वासार्हता गमावलेल्या एक्झिट पोलवर देशवासीयांनी अजिबात विश्वास ठेवू नये आणि मतमोजणीच्या दिवशी केंद्रांवर बाहेर आणि आत भाजपला एकाही मताची हेराफेरी करता येणार नाही यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. एक्झिट पोलचे निष्कर्ष अंतिम निकालांशी जुळले नाही तर त्यांचे उत्तरदायित्व नसते. त्यामुळे एक्झिट पोलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी संजय सिंह यांनी केली.