शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

कोण आहेत 'ते' अधिकारी, का पुकारलंय ममता बॅनर्जींनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 10:04 AM

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देममता बॅनर्जींचे केंद्र सरकारविरोधात बंडसीबीआय आणि स्थानिक पोलिसांमध्ये संघर्षकेंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही - ममता बॅनर्जी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलीस, असा उघड-उघड संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकात धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी संध्याकाळी (3 फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागानं कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरुन मोठा वादंग निर्माण झाला.

शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा जबाब नोंदवण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरच रोखले आणि  त्यांना शेजारच्या पोलीस ठाण्यात नेऊन अडकवून ठेवले. या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताने परिसरात तणाव वाढला.  

या सर्व घडामोडींदरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरल्या. ममत बॅनर्जी सुरुवातीस राजीव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यानंतर कोलकाता शहराच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी रात्रीच धरणे आंदोलन सुरू केले. याठिकाणी राजीव कुमारदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

 

पण, ममता बॅनर्जी ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी रात्रीपासून धरणे आंदोलनास बसल्या आहेत, ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊया. 

कोण आहेत राजीव कुमार? कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे विश्वसनीय मानले जातात. 2016 मध्ये सुरजीत कर पुरकायस्थ यांच्या जागी कुमार यांची कोलकाताच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर पुरकायस्थ यांना सीआयडी विभागात बढती देण्यात आली. -1989 बॅचमधील पश्चिम बंगाल कॅडरचे आयपीएस अधिकारी  - कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्ट फोर्सचे होते प्रमुख- शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांचे तपास अधिकारी होते. हा घोटाळा 2013 साली उघडकीस आला होता. 

सीबीआयला नोंदवायचा आहे जबाबया घोटाळ्यांमधील महत्त्वपूर्ण फायली आणि दस्तावेज कथित स्वरुपात गहाळ झाल्याने सीबीआयनं राजीव कुमार आणि अन्य अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. पण यातील एकही अधिकारी सीबीआयसमोर हजर झाला नाही. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कित्येक नेत्यांवरही आरोप आहे. या घोटाळ्यांमुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.  

 

राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी - ममता बॅनर्जीराजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. ते 24 तास आपले कर्तव्य पार पाडत असतात, असे ट्विट करत ममता बॅनर्जींना कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय, केंद्र सरकारची दादागिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असेही ट्विट ममता यांनी करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. \

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग