ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : अभिनेते ऋषी कपूर व कॉंग्रेसमध्ये ट्विट युद्ध सुरू झाले आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, त्यांना विसरता येणार नाही, असे कॉंग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी म्हटले आहे. आज सकाळी ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांनी सलग ट्विट करत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजीव गांधी फिल्म सिटी नाव देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
कपूर यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देताना चाको म्हणाले, ‘इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे देशाच्या विकासासाठी मोठे योगदान असून, त्यांना विसरून चालणार नाही. दोघांचा सन्मान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या नेत्यांच्या योगदानामुळेच विविध संस्थांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु, नावे बदला म्हणून सांगणारे ऋषी कपूर कोण. भाजपचे लक्ष वेधून घेण्यासाठी ऋषी कपूर अशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. असेही ते म्हणाले.
ऋषी कपूर दारुच्या नशेत बोलत आहेत, सध्या ते २४ तासांपैकी २० तास दारू पित असतात असे नवाब मलिक म्हणाले.