पटणा - देश तोडण्याची भाषा करणाऱ्या जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला पोलिसांनीअटक केली. सध्या शरजील इमामची दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. आसामला भारतापासून वेगळं करण्याचं विधान शेरजीलने केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर शरजीलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शरजीलच्या विधानावरुन देशभरात सुरु असणाऱ्या सीएए आणि एनआरसीविरोधातील आंदोलनाबाबत शंका उपस्थित होऊ लागली. पण शरजीलच्या विधानाशी सहमत नसल्याचं अनेकांनी स्पष्ट केलं. शरजीलवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. मात्र ३-४ दिवस शरजील अज्ञातवासात गेल्याने त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही.
पोलिसांच्या सूत्रानुसार शरजीलला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यावेळी शरजीलचा मित्र इम्रान याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. इम्रानकडून पोलिसांना शरजीलच्या प्रेयसीबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी शरजीलच्या प्रेयसीला गाठत तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. प्रेयसीवर पोलिसांनी दबाव टाकून शरजीलला भेटण्यासाठी बोलव अशी ताकीद दिली. त्यानंतर प्रेयसीने शरजीलला फोन लावून तिच्या घरी भेटण्यासाठी ये असं सांगितले. संध्याकाळच्या सुमारास शरजील त्याच्या प्रेयसीच्या घरी भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा मोठा कट?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
शरजील इमामबरोबर तुम्ही आहात की नाही?, शहांचा केजरीवालांना थेट सवाल
शरजील हा बिहारच्या जहानाबादमधला रहिवासी आहे. त्याचे वडील अकबर इमाम जेडीयूचे नेते राहिले आहेत. अकबर इमाम यांनी जेडीयूच्या तिकिटावरून जहानाबादवरून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शरजील कारण नसताना फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला आहे. शरजील इमामचा तपास क्राइम ब्राँचच्या पाच टीम करत होत्या. त्याच्याविरोधात सहा राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा
दरम्यान, 'शरजीलकडे बरीच संशयास्पद माहिती आहे. त्याच्याशी आतापर्यंत झालेल्या बोलण्यावरून हे सिद्ध झाले आहे की पीएफआय देखील काही प्रमाणात शरजीलच्या मागे आहे. परंतु याची पुष्टी करण्यासाठी अधिक वेळ गरजेचा आहे. भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं स्वप्न आहे असं शरजीलने सांगितले. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली.
महत्त्वाच्या बातम्या
प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी डॉ. कफील खान यांना अटक
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात
'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा; शेतकरी सन्मान निधीला लागणार कात्री?
आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी