मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय? शिवराज सिंह चौहान यांनी विचारताच दोन मंत्र्यांनी केले हात वर, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:34 PM2022-10-31T17:34:24+5:302022-10-31T17:36:15+5:30
Shivraj Singh Chauhan: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खास अंदाजात विद्यार्थ्यांना विचारले की, तुमच्यापैकी कोण होण मुख्यमंत्री बनू इच्छितो? त्याला उत्तर म्हणून शेकडो मुलांनी हात वर केले. ते पाहून व्यासपीठावर उपस्थित मंत्र्यांनीही हात वर केले
भोपाळ - मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाल यांनी सीएम राइज शाळांच्या नव्या इमारतींची पायाभरणी केली आहे. २ हजार ५१९ कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या ६९ शाळांच्या इमातरींचे व्हर्च्युअर भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शिक्षण आणि खेळासह जीवनात पुढे जाण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी खास अंदाजात विद्यार्थ्यांना विचारले की, तुमच्यापैकी कोण होण मुख्यमंत्री बनू इच्छितो? त्याला उत्तर म्हणून शेकडो मुलांनी हात वर केले. ते पाहून व्यासपीठावर उपस्थित असलेले शालेय शिक्षणमंत्री इंजरसिंह परमार आणि जलसंपदा मंत्री तुलसीराम सिलावट हेही स्वत:ला रोखू शकले नाहीत. त्यांनीही आपले हात वर केले.
इंदूरच्या अहिल्याबाई शाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मार्गदर्शकाच्या रूपात दिसून आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधला. तसेच विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांनी आपलेही सुरुवातीचे शिक्षण एका छोट्याशा गावातील सरकारी शाळेत कसे झाले, तसेच आपण शाळेत कसे जायचो याची माहिती दिली.
यावेळी शिवराज सिंह यांनी सांगितले की, जेव्हा मी खासदार झालो. त्यावेळी मी सरकारी शाळांमध्ये जायचो, तेव्हा विचार करायचो की, जर या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्व सुविधा दिल्या तर तेही चमत्कार करू शकतात. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर अशा शाळा सुरू करण्याचा संकल्प केला होता. या शाळांमध्ये प्रत्येक वर्गातील मुलांना शिक्षण, क्रीडा, कला आणि कौशल्य विकासाची मिळू शकेल.